योगेश पिंगळे
नवी मुंबई : निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे सर्वसाधारण सभेविषयी नगरसेवकांमध्ये उदासीनता निर्माण झाली आहे. नगरसेवक वेळेत न आल्यामुळे सभा सव्वादोन तास उशिरा सुरू झाली. जवळपास ५० टक्के नगरसेवकांनी दांडी मारल्यामुळे सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली.
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. यामुळे दोन महिन्यात जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू झाले आहेत. डिसेंबर महिन्याच्या सभेमध्ये २४४ कोटी रुपये खर्चाचे ८८ प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. २० डिसेंबरला यामधील फक्त १९ प्रस्ताव मंजूर झाले होते. उर्वरित प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी मंगळवारी सभेचे आयोजन केले होते.सकाळी ११ वाजताची वेळ देण्यात आली होती. दिलेल्या वेळेत एकही नगरसेवक सभागृहात नव्हते. १२ वाजता फक्त ९ सदस्य हजर होते. एक वाजता सदस्यांची संख्या ३६ झाली. सव्वाएक वाजता कामकाज सुरू झाले तेव्हा ११६पैकी फक्त ५४ जण उपस्थित होते.अनेक नगरसेवकांनी सह्या करून घरी जाणे पसंत केले. अनेक महत्त्वाचे विषय मंजुरीसाठी असतानाही लोकप्रतिनिधींमधील उदासीनता पाहून सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.सायंकाळी सहा वाजताही सभागृहात फक्त ४९ जण होते. सभेचे कामकाज संपले तेव्हा फक्त ४० सदस्य उपस्थित होते.सभेविषयी गांभीर्य राहिले नाहीच्यापूर्वी प्रशासनाकडून विकासकामे केली जात नसल्याबद्दल नगरसेवक तक्रार करत होते. प्रभागामधील कामे होत नसल्याबद्दल लक्षवेधीही मांडण्यात आली होती. प्रशासनाकडून शहरहिताच्या कामांचे प्रस्ताव तयार करून सभेत पाठविण्यास सुरुवात झाल्यानंतर नगरसेवकच सभेकडे पाठ फिरवू लागले आहेत.च्निवडणुका लागणार असल्यामुळे सभेविषयी अनेकांमध्ये गांभीर्य राहिलेले नाही. ज्यांच्या प्रभागामधील प्रस्ताव आहेत ते व ज्यांना कामकाजाविषयी आस्था आहे असे नगरसेवक सभेचे कामकाज पूर्ण होईपर्यंत थांबत असतात. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांची सर्वाधिक उपस्थिती होती. विरोधी पक्षनेते विजय चौगुले हेही सभेचे कामकाज संपेपर्यंत थांबले होते.सभेमधील विषय पुढीलप्रमाणेच्केंद्र शासनाच्या योजनेतून १०० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणेच्महापालिका क्षेत्रातील टायफॉईड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करणेच्आरोग्य विभागासाठी पॅथॉलॉजी साहित्य खरेदी करणेच्नेरूळ सेक्टर ५०मध्ये शाळेची इमारत बांधणेच्ऐरोली सेक्टर ३मध्ये जलकुंभ व पंपहाऊस बांधणेच्नेरूळ सेक्टर १९मधील यशवंतराव चव्हाण मैदानातील उर्वरित भाग विकसित करणेच्घणसोली सेंट्रल पार्कसाठी मलउदंचन केंद्रातील पाणी पुरविण्यासाठी जलवाहिनी पुरविणेसर्वसाधारण सभेला उपस्थित सदस्यवेळ उपस्थिती११ ०११.३० २१२ ९१२.३० २३१ ३६१.१५ ५४६ ४९७ ४०