पनवेलमध्ये एकाच वेळी सहा ठिकाणी मतमोजणी

By admin | Published: May 13, 2017 01:25 AM2017-05-13T01:25:15+5:302017-05-13T01:25:15+5:30

पनवेल महापालिका निवडणूक सुरळीत पार पडावी, याकरिता प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच गडबड,

Counting at six locations at Panvel simultaneously | पनवेलमध्ये एकाच वेळी सहा ठिकाणी मतमोजणी

पनवेलमध्ये एकाच वेळी सहा ठिकाणी मतमोजणी

Next

अरुणकुमार मेहत्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : पनवेल महापालिका निवडणूक सुरळीत पार पडावी, याकरिता प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच गडबड, गोंधळ निर्माण होवू नये याकरिता कामांचे सहा ठिकाणी विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर मतमोजणीसुद्धा एकाच ठिकाणी न होता स्वतंत्र होणार आहे. निवडणुकीचा दांडगा अनुभव असलेले पनवेलचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी याबाबत योग्य नियोजन केले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकूण २० प्रभागांचा समावेश आहे. त्यामधून ७८ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. शहरासह सिडको वसाहतीत आणि समाविष्ट करण्यात आलेले गाव महापालिका हद्दीत आहे. विस्तृत क्षेत्रफळ असलेल्या पनवेल महापालिका हद्दीत ५,०९,९०१ इतकी लोकसंख्या तर ४,२५,४५३ इतके मतदार आहेत. एकूण ५७० मतदान केंद्रांवर २४ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
निवडणुकीकरिता एकूण सहा निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याकडे तीन ते चार प्रभाग देण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीला एक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी देण्यात आला.
नावडे, कळंबोली, खारघर, कामोठे, व्ही.के. हायस्कूल आणि पनवेल महानगरपालिका भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी बसतात. त्या ठिकाणी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे. अर्ज भरण्यापासून छाननी, अर्ज मागे घेणे तसेच चिन्ह वाटपाची कामे याच ठिकाणाहून करण्यात आली आहेत. त्यामुळे सिडको नोडमधील उमेदवारांना महापालिकेतील हेलपाटे वाचले आणि त्याच ठिकाणी सर्व कामांचा निपटारा झाला. त्याचबरोबर कोणत्याही राजकीय पक्षाला एकाच वेळी एकाच ठिकाणी भव्य शक्तिप्रदर्शनही करता आले नाही. त्याचबरोबर २६ मे रोजी मतमोजणी सुध्दा त्याच ठिकाणी होणार असल्याने वाहतूककोंडी टाळता येईल.

Web Title: Counting at six locations at Panvel simultaneously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.