शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

देशातील समुद्राखालील पहिला बोगदा लवकरच दृष्टिपथात; बीकेसी-शीळफाटा दरम्यान धावणार बुलेट ट्रेन

By नारायण जाधव | Published: June 10, 2023 4:41 PM

६३९७ कोटींचे हे काम आहे. यामुळे देशातील समुद्राखालील हा पहिला बोगदा २०२८ पर्यंत दृष्टिपथात येणार आहे.

नवी मुंबई : मुंबई-अहमदबाद या ५०८ किमी बुलेट ट्रेनच्या मार्गातील सर्वात आव्हानात्मक काम असलेल्या ठाणे खाडीसह बीकेसी ते शीळफाटा दरम्यानच्या २१ किमीच्या बोगद्यासाठी एप्रिल महिन्यात ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्सने निविदा जिंकल्यानंतर आता नॅशनल हायस्पीड काॅर्पोरेशनने शुक्रवारी याबाबतच्या करारावर सह्या केल्या. ६३९७ कोटींचे हे काम आहे. यामुळे देशातील समुद्राखालील हा पहिला बोगदा २०२८ पर्यंत दृष्टिपथात येणार आहे.

बीकेसी ते शीळफाटा या ३५ किमीच्या मार्गात २१ किमीचा हा बोगदा राहणार असून यातील सात किमीचा बोगदा हा ठाणे खाडीखालून जाणार आहे. समुद्राखालून जाणारा हा देशातील पहिला बोगदा मुंबईच्या विक्रोळी ते नवी मुंबईतील घणसोली दरम्यान राहणार आहे.

पर्यावरण दक्षता घेण्याचे आव्हान -ठाणे खाडीचा परिसर आधीच पर्यावरणात्मकदृष्ट्या संवेदनशील असा राहिला आहे. प्रदूषणामुळे ठाणे खाडीचे मोठे नुकसान झाल्याचे अहवाल वारंवार प्रसिद्ध झाले आहेत. त्यातच ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित झाली असून गेल्या वर्षीच रामसर क्षेत्राचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. यामुळे या संवेदनशील क्षेत्रात काम करताना मोठी दक्षता घेऊन सर्व पर्यावरणविषयक नियम पाळून तो खोदण्याचे आव्हानात्मक काम आता निविदाकार ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्सला करावे लागणार आहे.समुद्राखाली ४० मीटर खोल -समुद्राखालील देशातील हा पहिला बोगदा १३.१ मीटर व्यासाचा राहणार असून तो जमिनाखाली २५ ते ४० मीटर खोल राहणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बहुतांश मार्ग हा उन्नत असाच आहे. यात सर्वात मोठा भूमिगत मार्ग हा २१ किमीचा बाेगदा राहणार आहे.पारसिक डोंगराखालची खोली ११४ मीटरखाडीखाली ४० तर पारसिक डाेंगराखाली ११४ मीटर खोली राहणार आहे. या बोगद्याच्या मार्गात सर्वात मोठी वृक्षतोड (१८२८ झाडांची) विक्रोळीत करावी लागणार आहे.न्यू ऑस्ट्रियन टनेलिंगचा वापरहा बोगदा खोदण्यासाठी टनेल बोअरिंग आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत वापरली जाणार आहे. यात १६ किमीच्या कामासाठी तीन टनेल बोअरिंग मशिन तर उर्वरित पाच किमीसाठी न्यू ऑस्ट्रियन टनेल मशिन वारण्यात येणार आहेत. यासाठी बीकेसीत ३६, विक्रोळीत ५६ आणि सावली येथे ३९ मीटर खोलीवर तीन शॉफ्ट टाकण्यात येणार आहेत. यासाठी १३.१ मीटर व्यासाच्या कटर हेडच्या टीबीएम मशिनचा वापर केला जाणार आहे. सध्या मेट्रोच्या बोगद्यांसाठी ५ ते ६ मीटर व्यासाच्या कटर हेडचा वापर केला जातो. यामुळे हा बोगदा किती मोठा असेल, याचा अंदाज येईल.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई