शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

मधमाशी पालनासाठी खारघर ‘बी सिटी’, देशातील पहिला उपक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 2:05 AM

मधाची गोडी प्रत्येकालाच आवडते. मात्र शहरी भागात मध मिळणे हे दुर्मिळच. मधमाशी पालन हे मुख्यत्वे ग्रामीण भागात पहावयास मिळते.

- वैभव गायकरपनवेल : मधाची गोडी प्रत्येकालाच आवडते. मात्र शहरी भागात मध मिळणे हे दुर्मिळच. मधमाशी पालन हे मुख्यत्वे ग्रामीण भागात पहावयास मिळते. मात्र खारघर शहरात देशातील पहिला ‘बी सीटी’ प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाद्वारे तयार करण्यात आलेल्या मधमाशांच्या पेट्या आपल्या गच्चीवर अथवा गार्डन परिसरात लावून शुद्ध मधाची निर्मिती करता येणार आहे.मधाचे औषधी गुणधर्म मोठे आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दररोज मध सेवन करणे आवश्यक आहे. मात्र भारतात मधमाशी पालनाचे प्रमाण खूप कमी आहे. शहरीकरणामुळे शुध्द मध मिळणेही दुर्मिळ झाले आहे. बाजारात मिळणारे मधही भेसळयुक्त असल्याने खारघर शहरातील डॉ युवराज कागीणकर यांनी, बी सिटी प्रकल्प राबविण्याची योजना आखली आहे.निसर्गाचे वरदान लाभलेल्या सेक्टर ५ मधील डोंगरमाथ्याच्या परिसरात कागीणकर यांनी, मधमाशा पालनासाठी २५ पेट्या लावल्या आहेत. बी सिटी (मधमाशांचे शहर) हे संकल्पना मुख्यत्वे करून अमेरिका, जर्मनी, ब्रिटन आदींसह मोठ्या प्रमाणात युरोपात राबविली जाते. भारतात मधमाशी पालनाबाबत जनजागृती नाही. डॉ कागीणकर यांनी याकरिता पुढाकार घेतला असून शहरातील रहिवाशी आपल्या घरी, गच्चीवर गार्डनमध्ये अशाप्रकारे मधमाशा पालन करून शुद्ध मधाचे उत्पादन करू शकतात. उपक्रमाअंतर्गत २ बाय १. ५ आकाराची विशेष तयार करण्यात आलेली पेटी (हनीबी बॉक्स) कागीणकर उपलब्ध करून देऊ शकतात. यामध्ये मधमाशांची मात्रा देखील ठरलेली असते. त्याची योग्य रित्या निगा राखल्यास महिनाभरात एका किलोच्या आसपास शुद्ध मध मिळू शकेल. शहरी भागात शुद्ध मधाच्या नावाखाली भेसळयुक्त मधाची विक्री केली जाते. त्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. सफरचंद, बदाम, कांद्याच्या उत्पादनात मधमाशांची भूमिका महत्त्वाची असते. संबंधीत ठिकाणी मधमाशांचा वावर नसेल तर हे उत्पादन योग्य रित्या होऊ शकणार नसल्याचे डॉ युवराज कागीणकर यांनी सांगितले.बी सिटी ही संकल्पना अद्याप भारतात फारसी प्रचलित नाही. खारघर शहरात आम्ही हा प्रयोग राबवत आहोत. याकरिता सेक्टर ५ मध्ये२५ हनी बी बॉक्स ठेवलेले आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो.- डॉ. युवराज कागीणकर, संस्थापक, बी सिटी खारघर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड