अंबरनाथ : अंबरनाथच्या भगतसिंग नगर परिसरात राहणाऱ्या अरमान शेख या तरुणाने अमली पदार्थाच्या व्यसनामुळे आत्महत्या केली. या तरुणाच्या आईने पोलीस प्रशासनाकडे अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिसरातील सर्वच तरुण आमली पदार्थाच्या आहारी जात असल्यामुळे पोलीस प्रशासनाने आता तरी अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करावी एवढी माफक अपेक्षा व्यक्त केली आहे.
सोमवारी अंबरनाथच्या भगतसिंग नगर परिसरामध्ये अरमान या व्यसनाधीन तरुणाला अमली पदार्थ न मिळाल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणानंतर आता भगतसिंग नगर परिसरातील महिलांनी अमली पदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. आरमान याचा व्यसनामुळे मृत्यू झाला असला तरी या व्यसनेच्या आहारी याच परिसरातील अनेक तरुण गेले असून ते देखील अशाच पद्धतीने आपला जीव गमावणार आहे, या भीतीने आता परिसरातील महिलांनी एकत्रित येत पोलीस प्रशासनाकडे अमली पदार्थ विकणाऱ्यांची तक्रार केली आहे. उघडपणे भगतसिंग नगर परिसरात आमली पदार्थांची विक्री होत असताना देखील पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी एवढी माफक अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.
दुसरीकडे या परिसरात आमला पदार्थांची विक्री होत असल्याची बाब पोलिसांच्या ही निदर्शनास आलेले असतानाही संबंधित आरोपींवर अद्यापही कारवाई झालेली नाही. या परिसरातील गावगुंड आणि तडीपार गुंड देखील याच अमली पदार्थांची विक्री करून परिसरात दहशत निर्माण करीत आहे. या परिसरात सहा ते सात घरांमध्ये उघडपणे अमली पदार्थांची विक्री केली जाते. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची सर्व हिस्ट्री पोलीस प्रशासनाकडे असताना देखील त्या आरोपींकडे उघडपणे दुर्लक्ष करीत आहे. भगतसिंग नगर परिसरामध्ये सोलुशन, गांजा,चरस, आणि बटन नावाच्या अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे या अमली पदार्थांची विक्रीवर कुठेतरी रोख लावण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना विचारले असता या परिसरात पोलिसांमार्फत नेहमी कारवाई केली जाते मात्र त्या कारवाईदरम्यान कोणतेही अमली पदार्थ हाती लागत नसल्याची खंत व्यक्त केली.