नालेदुरुस्तीचे प्रस्ताव तयार करा; महापौरांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:25 AM2019-06-01T01:25:12+5:302019-06-01T01:25:38+5:30
सेक्टर-३ ऐरोली बस डेपो नाला सेक्टर-२० जवळील नाला व सेक्टर-२९ ऐरोली येथील नाल्यांमधील कामाची पाहणी केली. या नाल्यांची दुरु स्ती व डागडुजी तत्काळ हाती
नवी मुंबई : परिमंडळ दोनमधील महत्त्वाच्या नाल्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. डागडुजीची कामे लवकरात लवकर करण्यात यावीत, अशा सूचना महापौर जयवंत सुतार यांनी केल्या आहेत.
परिमंडळ दोनमधील नालेसफाईच्या कामांची शुक्रवारी महापौरांनी पाहणी केली. दिघा कार्यक्षेत्रातील सेंच्युरी नाला, आंबेडकरनगर नाला, गणपतीपाडा नाला ईश्वरनगर रेल्वेलाइननगर नाला व मुकुंद कंपनी जवळील नाला तसेच ऐरोली येथील भारत बिजली (ठाणे-बेलापूर महामार्ग) सेक्टर-३ ऐरोली बस डेपो नाला सेक्टर-२० जवळील नाला व सेक्टर-२९ ऐरोली येथील नाल्यांमधील कामाची पाहणी केली. या नाल्यांची दुरु स्ती व डागडुजी तत्काळ हाती घेण्याचे आदेश देऊन त्यानुसार प्रस्ताव जलद गतीने पाठविण्याचे निर्देश दिलेले आहेत, तसेच विभाग अधिकारी, स्वच्छता आधिकारी व स्वच्छता निरीक्षक ऐरोली व दिघा विभाग यांना नाले सफाईचे राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे निर्देश दिले. या वेळी स्थायी समिती सभापती नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते, जगदीश गवतेंसह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.