पनवेल : नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटा बदलून देतो असे सांगून फसवणूक करणा-या खांदेश्वर पोलीस ठाण्यातील मुकुंद म्हसाणे या हवालदाराला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस हवालदारासह १० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वपोनि दिलीप काळे यांनी दिली.खांदेश्वर पोलीस सध्या वादाच्या भोवºयात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी तक्र ार दाखल करण्यासाठी फिर्यादीकडून एक हजार रु पयांची मागणी करणाºया एका महिला कॉन्स्टेबलची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती, तर गेल्या वर्षी खांदा वसाहतीतील एका बारमध्ये भांडण व दमदाटी करत बारमधील वेटरला शिवीगाळ केल्याप्रकरणी एका हवालदाराला निलंबित करण्यात आले होते. या अशा प्रकारांमुळे पोलिसांची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत आहे. त्यातच १ कोटीच्या जुन्या नोटा बदलून देतो असे सांगून जुन्या नोटा घेऊन परत न देणाºया मुकुंद म्हसाणे या हवालदाराविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह पत्नी अनिता, मुलगा व इतर सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एपीएमसीतील एका व्यापाºयाच्या वाशीतील घरात दरोडा टाकल्याप्रकरणी हवालदार म्हसाणे यांच्या पत्नी अनिता म्हसाणे यांना अटक झाली आहे. पोलिसांनीच अशी फसवणूक केल्यावर विश्वास तरी कोणावर ठेवायचा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाआहे.नोव्हेंबर २०१६ मध्ये उरणकर या महिलेला जुन्या नोटा बदलून देतो असे सांगून हवालदार मुकुंद म्हसाणे यांनी तिच्याकडील १ कोटी रु पयांच्या जुन्या नोटा घेतल्या. मात्र एक वर्ष उलटूनही पैसे परत न मिळाल्याने महिलेने म्हसाणे यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार के ली.
पोलिसासह १० जणांवर गुन्हा, म्हसाणेविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 2:27 AM