सुदाम पाटीलसह आठ जणांवर गुन्हा
By Admin | Published: January 10, 2017 06:50 AM2017-01-10T06:50:46+5:302017-01-10T06:50:46+5:30
काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षांसह इतर ८ जणांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
तळोजा : काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षांसह इतर ८ जणांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एका डॉक्टरला सिडकोचे भूखंड व त्याचे चुकीचे कागद सादर करून कोट्यवधी रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुदाम गोकुळ पाटील व त्यांचे वडील गोकुळ पाटील यांच्यासह, अविनाश पांडुरंग कोळी, नरेश पांडुरंग म्हात्रे, प्रकाश नागा भोईर, संजय पांडुरंग कोळी, संजय दत्तात्रेय पाटील, वसंत सावळाराम शेट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भूखंडावर बांधकाम करण्यासाठी सिडकोकडून परवान्यासाठी विलंब होत असल्याने आलाट यांनी बेलापूर सिडकोकडे विचारणा केली असता, असे भूखंडवाटप झाले नसल्याचे समोर आहे. सुदाम पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी कळंबोली, सेक्टर १६ येथील सहा भूखंडाचा व्यवहार करून तब्बल २० कोटी ५० लाखांचा भूखंड सिडकोकडून आलाट यांना मिळवून दिला. मात्र, अनेक महिने उलटूनही बांधकामांची परवानगी न मिळाल्याने आलाट यांनी चौकशी केली असता, त्यांना देण्यात आलेली कागदपत्रे खोटी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात सुदाम पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)