शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

धक्कादायक! आई वडिलांनीच दिले ११ वर्षीय मुलीला चटके; पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

By सूर्यकांत वाघमारे | Published: March 21, 2023 4:31 PM

सिबीडी येथील टाटानगर झोपडपट्टी परिसरात एका सामाजिक संघटनेमार्फत पाहणी सुरु असताना रिटा गुप्ता (११) हि मुलगी घाबरलेल्या अवस्थेत आढळून आली होती.

नवी मुंबई - अकरा वर्षीय मुलीला जबर मारहाण करून चटके दिल्याप्रकरणी तिच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीडी बेलापूर परिसरात सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत झालेल्या पाहणीत हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी त्यांनी मुलीकडून घटनेची वाच्यता करून घेतल्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली आहे. 

सिबीडी येथील टाटानगर झोपडपट्टी परिसरात एका सामाजिक संघटनेमार्फत पाहणी सुरु असताना रिटा गुप्ता (११) ही मुलगी घाबरलेल्या अवस्थेत आढळून आली होती. यामुळे संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली. यामध्ये तिने आपल्याला आई वडिलांकडून अमानुष मारहाण होत असल्याचे सांगितले. त्याच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर व पायावर चटके दिल्याच्या जखमा आढळून आल्या. त्यानुसार या घटनेप्रकरणी त्यांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केली असता तिचे आई वडील नीलम गुप्ता व प्रमोद गुप्ता यांच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.