व्यावसायिकाकडे हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा; पैसे न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी
By सूर्यकांत वाघमारे | Published: November 7, 2022 06:27 PM2022-11-07T18:27:47+5:302022-11-07T18:28:30+5:30
दिघा येथील व्यावसायिकाकडे ३ हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : दिघा येथील व्यावसायिकाकडे ३ हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हप्ता न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी त्यांनी दिली होती. यापूर्वीपण ते दोघे येऊन हप्त्याची मागणी करून गेले होते.
दिघा येथील ईश्वरनगर परिसरात हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी रामआचल सिंग यांचा छोटा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे अज्ञात दोघे आले होते. त्यांनी हप्ता स्वरूपात १० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र सिंग यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला होता. ३ नोव्हेंबरला ते दोघे पुन्हा आले असता त्यांनी ३ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. मात्र सिंग यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या दोघांनी परिसरात सर्वजण आपल्याला हप्ता देतात असे सांगत त्यांनाही तो देण्याचा इशारा दिला. अन्यथा दुकान जाळण्याची धमकी देऊन तिथून निघून गेले.
यामुळे सिंग यांनी त्या दोघांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याद्वारे अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेवरून दिघा परिसरात व्यावसायिकांकडून गुन्हेगार व्यक्ती हप्ता उकळला असल्याचा प्रकार समोर येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"