अनधिकृत भित्तीपत्रक चिपकविणाऱ्यांवर गुन्हे
By admin | Published: May 9, 2017 01:33 AM2017-05-09T01:33:06+5:302017-05-09T01:33:06+5:30
अनधिकृत होर्डिंगसह भित्तीपत्रक लावून शहर विद्रूप करणाऱ्यांविरोधात महापालिकेने मोहीम तीव्र केली आहे. सीबीडी सेक्टर ११ मध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अनधिकृत होर्डिंगसह भित्तीपत्रक लावून शहर विद्रूप करणाऱ्यांविरोधात महापालिकेने मोहीम तीव्र केली आहे. सीबीडी सेक्टर ११ मध्ये दहापेक्षा जास्त जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून ही मोहीम नियमितपणे सुरू ठेवली जाणार आहे.
महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात व शहर विद्रूप करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विभाग कार्यालयाच्यावतीने कारवाईला सुरवात केली आहे. बेलापूर विभाग कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या प्रकाश हरिश्चंद्र बागडे यांनी पाहणी केली असता सेक्टर ११ मध्ये रेंटल फ्लॅट, सेल्स, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रिक्वायर, होमस पेंट सोल्युशन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह एल. आय. सी. एजंट, जी. बी. एंटरप्रायजेस, शिपिंग आॅफशोअर, जब रिक्वायरमेंट, कर्ज मिळविणे, पी. जी. सुपर लक्झरी व इतर कंपन्यांचे भित्तीपत्रक आढळून आले. भित्तीपत्रक चिपकविण्यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली नव्हती. यामुळे संबंधितांविरोधात सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच धर्तीवर नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा विभाग कार्यालयाच्यातवीनेही गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे.