कटारनवरे हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:42 AM2017-11-23T02:42:53+5:302017-11-23T02:42:57+5:30
नवी मुंबई : अमित कटारनवरे याच्यावरील हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
नवी मुंबई : अमित कटारनवरे याच्यावरील हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. कटारनवरे याच्यावर देखील यापूर्वीचे गुन्हे दाखल असल्याने पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बारा दिवसांनंतरही त्याने पोलिसांकडे जबाब नोंदवला नसल्याने संपूर्ण प्रकरणावरच संशय व्यक्त होत आहे.
नेरुळ येथे राहणाºया अमित कटारनवरे याच्यावर १२ नोव्हेंबर रोजी अज्ञात टोळीने प्राणघातक हल्ला केला होता. कटारनवरे कार्यालयात एकटे असताना हा हल्ला झाला होता. यामध्ये त्याचे थोडक्यात प्राण बचावले असून, त्याच्यावर सध्या कल्याणमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. या वेळी रुग्णालयात जाऊन पोलिसांनी कटारनवरे याचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने असहकार्याची भूमिका घेतली होती. अखेर कटारनवरे याचे अनेकांसोबत वाद असल्याने व त्याच्यावरही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करून हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्हीमधून काही संशयितांची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यावरून हल्ल्यामागचे कारण स्पष्ट होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.