रेल्वे मार्गावर घडणारी गुन्हेगारी नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 01:21 AM2020-12-15T01:21:29+5:302020-12-15T01:21:33+5:30

कोरोनाचा परिणाम; अनलॉकनंतर घडले पंधरा गुन्हे

Crime control on railways | रेल्वे मार्गावर घडणारी गुन्हेगारी नियंत्रणात

रेल्वे मार्गावर घडणारी गुन्हेगारी नियंत्रणात

Next

नवी मुंबई : कोरोनामुळे रेल्वे मार्गावर घडणारी गुन्हेगारीही नियंत्रणात आली आहे. केवळ शासकीय व्यक्ती व ठरावीक वेळीच सर्वसामान्यांना रेल्वेने प्रवासाची मुभा आहे. यामुळे गुन्हेगारांच्या हालचालींना लगाम लागल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबईतल्या ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर अनेक गुन्हे घडत असतात. त्यापैकी बहुतांश गुन्हे हे गर्दीच्या वेळीच घडतात. लोकलमध्ये असलेली गर्दी हेरून प्रवाशांचे पाकीट मारणे, मोबाइल पळवणे, याशिवाय बॅग चोरणे असे गुन्हे घडत असतात. चालू वर्षातच अवघ्या जानेवारीमध्येच १७९ तर फेब्रुवारीमध्ये १५५ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे, परंतु लॉकडाऊननंतर अनलॉक झाल्यानंतर रेल्वे रुळावर येऊनही गुन्हेगारांना रेल्वेत शिरकाव करण्याची फारशी संधी मिळालेली नाही. यामुळे बऱ्याच अंशी गुन्हेगारी कृत्ये नियंत्रणात आली आहेत, तर अनलॉकनंतर पाच महिन्यांत केवळ अकरा गुन्ह्यांची नोंद वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यापैकी ८ गुन्ह्यांची उकलही पोलिसांनी केलेली आहे. लॉकडाऊननंतर रेल्वे पुन्हा सुरू होऊनही गर्दी होत नसल्याने चोरट्यांना हात मारण्याची संधीच मिळत नाहीये. यामुळे वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारीचा आलेख खाली आला 
आहे.   
अनेकांच्या हातावर फटका मारून हातातली बॅग पळविल्याचेही प्रकार घडले आहेत. रेल्वे प्रवासा दरम्यान घडले  आहेत.

सर्वाधिक गुन्हे कुठले?
नवी मुंबईत रेल्वेतून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मोबाइल व बॅगचोरीचे सर्वाधिक गुन्हे आहेत. रेल्वेतल्या गर्दीची संधी साधून चोरी केली जात असल्याचे वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू केसरकर यांनी सांगितले, त्याशिवाय बॅग पळविणे, हातावर फटका मारून हातातली वस्तू पळविणे, असेही गुन्हे घडत असतात.

रेल्वेत घडलेले गुन्हे 
रेल्वेत असलेली प्रवाशांची गर्दीच गुन्हेगारांना संधी देत असते. अशा गर्दीत घुसलेले चोरटे प्रवाशांचे पाकीट मारतात, शिवाय हातचलाखीने मोबाइलही 
पळवतात. 

Web Title: Crime control on railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.