विशेष आर्थिक क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:24 AM2019-12-29T00:24:58+5:302019-12-29T00:25:09+5:30

१५० एकर पाणथळ जमिनीवर भराव; तीन एकर जागेवरील कांदळवन केले नष्ट

Crimes against officers of Special Economic Zones | विशेष आर्थिक क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

विशेष आर्थिक क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

Next

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (एनएमएसईझेड) उपलब्ध करून दिलेल्या जमिनीवर भराव करण्याचे काम सुरू आहे. संबंधितांनी भेेंडखळमधील १५० एकर पाणथळ क्षेत्रावर भराव टाकला असून, पागोटे गावाजवळील ३ एकर जमिनीवरील कांदळवन नष्ट केले आहे. या प्रकरणी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांवर व भराव टाकणाºयाविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एनएमएसईझेडमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. भेंडखळ व पागोठे परिसरामध्ये पाणथळ क्षेत्रामध्ये भराव टाकला जात आहे. कांदळवन नष्ट केले जात असून, पर्यावरणाची हानी थांबविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी लढा देण्यास सुरुवात केली आहे. नंदकुमार पवार, बी. एन. कुमार व तुकाराम कोळी यांनी याविषयी शासनस्तरावर व कांदळवन समितीकडेही वारंवार तक्रारी केल्या आहेत. निसर्गाची हानी होत असल्याबद्दल पुरावेही दिले आहेत. कांदळवन समितीच्या ९ डिसेंबरच्या बैठकीमध्येही या विषयावर चर्चा करण्यात आली होती. एसईझेड परिसरातील डेब्रिज काढण्यात यावे. भंडखळ व पाणजे परिसरातील कांदळवनाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. भराव काढून जैसे थे स्थिती करावी, असे आदेश रायगड जिल्हाधिकारी व सिडकोला देण्यात आले होते. यानंतर प्रशासनाने पर्यावरणारी हानी करणाºयांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बोकडवीरा परिसराचे तलाठी हासुराम आंबो वाघ यांनी १३ डिसेंबरला पंचांसह भेेंडखळ परिसरामध्ये जाऊन पाहणी केली. भेंडखळ गावाच्या उत्तरेला एसईझेडच्या संरक्षण भिंतीच्या आतमध्ये १५० एकर जमिनीवर भराव टाकून कांदळवन नष्ट केल्याचे निदर्शनास आले. यामुळे एनएमएसईझेडच्या पदाधिकाºयांविरोधात उरण पोलीस ठाण्यात २० डिसेंबरला गुन्हा दाखल केला आहे.

भेंडखळप्रमाणेच पागोटे परिसरामध्येही कांदळवन नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी मंडल अधिकारी मच्छींद्र मोहिते यांनी याविषयी तक्रार दिली आहे. नंदकुमार पवार यांनी २८ आॅगस्टला कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून ८ नोव्हेंबरला महसूल विभागाच्या अधिकाºयांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. २२ नोव्हेंबरला वनरक्षक माया भोसले, सिडकोचे अधिकारी, नवघर तलाठी व इतर अधिकाºयांनी करंजा पोर्ट ते पनवेल रोडलगत पागोटेमध्ये एसईझेडच्या परिसराची पाहणी केली. या परिसरातील ७ ते ८ एकर जमिनीपैकी ३ एकर जमिनीवरील कांदळवन तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. एसईझेडच्या व्यवस्थापनाने पर्यावरणाची हानी केल्याचे प्राथमिक पाहणीमध्ये निदर्शनास आल्यामुळे त्यांच्याविरोधात १९ डिसेंबरला उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाणजे परिसरामध्ये अनधिकृतपणे भराव केला जात असल्याची तक्रार महसूल विभागाला प्राप्त झाली होती. डोंगरी विभागाच्या तलाठी शमा पवार यांनी १६ डिसेंबरला घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका डंपरमधून ४ ब्रास माती तेथील जमिनीवर टाकण्यात येत होती. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एनएमएसईझेड परिसरामध्ये पाणथळ जमिनीवर भराव टाकल्या प्रकरणी व कांदळवन नष्ट केल्या प्रकरणी तीन तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारीवरून एनएमएसईझेड पदाधिकाºयांवर व एका तक्रारीवरून डंपर चालकांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
- जगदीश कुलकर्णी,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण

कांदळवन समितीने घेतली दखल
उरण तालुक्यामध्ये पाणथळ जमीन व कांदळवन नष्ट केली जात आहे. जवळपास १६५ जमिनीवर डेब्रिजचा भराव टाकला जात असून याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी लढा सुरू केला आहे.
मुख्यमंत्री, कोकण विभागीय आयुक्तांसह कोकण कांदळवन समितीकडेही तक्रारी केल्या आहेत.
कोकण पाणथळ तक्रार निवारण समितीने डिसेंबर महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये या तक्रारीची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याच्या सूचना रायगड जिल्हाधिकारी व सिडकोला दिल्या आहेत.
यानंतर महसूल विभागाने तत्काळ घटनास्थळाची पाहणी करून भराव टाकणाºया व कांदळवन नष्ट करणाºयांवर गुन्हे दाखल केले आहेत.

भराव कधी काढणार
कोकण पाणथळ तक्रार निवारण समितीने पाणजे व भेंडखळ परिसरामधील पाणथळ जमिनीवर टाकलेला भराव काढण्यात यावा.
भराव काढून पाणथळ जमीन जशी आहे तशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आता भराव कधी काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Crimes against officers of Special Economic Zones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.