पनवेल : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण न करता खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची दीड कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात मे. ओम साई कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटे) येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या आराखडा व अंदाजपत्रकासह जुलै २००५ अन्वये १ कोटी ९९ लाख ७७ हजार २१३ या रकमेस तांत्रिक मंजुरी देण्यात आली. त्यानुसार ई निविदा प्रक्रि येचा वापर करून मे.ओम साई कन्स्ट्रक्शन यांनी १५ फेब्रुवारी २०१६ मध्ये कामास सुरुवात केली. योजनेमध्ये कास्टिंग आयर्नऐवजी प्लॅस्टिक पाइपचे कामकाज करून शासनाची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नागरिकांतर्फे तक्र ार करण्यात आली होती.नळ पाणीपुरवठा योजना ही राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमा अंतर्गत मंजूर असून या योजनेचे कंत्राट मे.ओम साई कन्स्ट्रक्शन (रेवस, अलिबाग) कंपनीतर्फे रवि नाखवा यांना देण्यात आले होते. या योजनेमध्ये अंदाजपत्रकाप्रमाणे कामकाज न करता बनावट मोजमाप पुस्तिका तयार केली. तसेच देयकावर उपअभियंता पाणीपुरवठा विभाग व शाखा अभियंता यांच्या खोट्या स्वाक्षºया करून १ कोटी ६१ लाख ८२ हजार ७८२ रु पयांचे देयक मंजूर करून घेतले होते. प्रत्यक्षात मात्र नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट स्थितीत असल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.>खोपटा ग्रामपंचायतीतील खोपटा हे गाव मावळचे खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे यांनी दत्तक घेतलेले आहे. त्यामुळे या फसवणुकीची दखल घेऊन खासदारांनी सदरची योजना पूर्ण करून पाणीपुरवठा करण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
फसवणूकप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:24 PM