शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

महापालिका आयुक्तांच्या आदेशाला हरताळ

By admin | Published: May 16, 2017 12:57 AM

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील खोदकाम तत्काळ बंद करण्यात यावे. यापूर्वी खोदलेले चर तत्काळ दुरुस्त करण्यात यावेत असे आदेश पालिका

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील खोदकाम तत्काळ बंद करण्यात यावे. यापूर्वी खोदलेले चर तत्काळ दुरुस्त करण्यात यावेत असे आदेश पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिले आहेत. परंतु या आदेशाला हरताळ फासून खोदकाम करणाऱ्यांना अभय दिले जात आहे. नेरूळमध्ये एमजीएल गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असून याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. आयुक्त रामास्वामी एन. यांनी मागील आठवड्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेसह,पोलीस, एमआयडीसीसह सर्व संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये शहरातील खोदकाम तत्काळ थांबविण्याच्या सूचना केल्या होत्या. एमजीएल, एमटीएनएल, महावितरण व इतरांनी आता आपत्कालीन स्थिती वगळता इतर कोणत्याही कामांसाठी रस्ते खोदू नयेत. यापूर्वी खोदकाम केलेल्या रस्त्यांची तत्काळ डागडुजी करण्यात यावी अशा सूचना दिल्या होत्या. परंतु महापालिका प्रशासनाने या सर्व नियमांना हरताळ फासला आहे. दोन दिवसांपासून नेरूळ सेक्टर २० मधील तलाव ते एन. आर. भगत स्कूलपर्यंतचा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात येत आहे. घाईगडबडीत रस्ता खोदून पाइप टाकण्याचे काम केले जात आहे. वास्तविक वळवाचा पाऊस पडून गेलेला असताना व कोणत्याही क्षणी पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता असताना खोदकाम करणे योग्य नाही. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराला पाठीशी घालून चांगले रस्ते खोदण्यास सुरवात केली आहे. यापूर्वीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले जात होते. त्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होण्याची भीती असल्याने तत्काळ आदेशाचे पालन होत होते. परंतु विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांनी अद्याप कडक भूमिका घेतली नसल्याने त्यांचे आदेश पायदळी तुडवित खोदकाम करणाऱ्यांवर व त्यांना अभय देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.