शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
2
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
3
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
4
पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
6
श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."
7
महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?
8
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
9
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
10
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
12
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
13
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
14
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
15
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
16
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
17
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
18
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
19
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
20
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट

सिडकोच्या कारवाईला तीव्र विरोध, प्रकल्पग्रस्त झाले आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 1:46 AM

कोल्ही-कोपर येथील घटना : प्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याने कारवाई थांबविली

पनवेल : कोल्ही कोपर येथे ३१ एकर जागेवर कोपर गावातील ग्रामस्थांनी बांधलेल्या घरांवर कारवाई करण्यासाठी सिडकोने शुक्रवारी मोहीम राबविली होती. ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्यामुळे सिडकोच्या पथकाला कारवाई न करताच परत जावे लागले.सरकारने येथील जमीन संपादित करून पनवेल नगरपरिषदेला मलनि:सारण केंद्र उभारण्यासाठी दिली होती. या जागेचा मोबदला अद्याप स्थानिक प्रकल्पग्रस्तांना मिळाला नसल्याने ग्रामस्थांनी या जागेवर चाळी बांधल्या आहेत. ही जमीन आता विमानतळासाठी वर्ग करण्यात आली असल्याने जागेचा ताबा घेण्यासाठी अतिक्र मण विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तामध्ये याठिकाणी आले होते. ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येऊन कारवाईला विरोध केला.

पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे ही कारवाई पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे अधिकारी विशाल ढगे यांनी दिली. पुढील आठ दिवसांत ही कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. दरम्यान, कारवाई थांबविण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक घटनास्थळी उपस्थित होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत यासंदर्भात बैठक घेऊन ग्रामस्थ व सिडको अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ही जमीन कोपर गावातील ३0 शेतकऱ्यांच्या मालकीची होती अशी माहिती स्थानिक प्रकल्पग्रस्त प्रशांत पाटील यांनी दिली. अनेक वर्षे होऊन देखील आम्हाला आमच्या जागेचा मोबदला मिळाला नसल्याने आम्ही याठिकाणी घरे बांधली आहेत. आम्हाला जागेचा मोबदला सर्वप्रथम मिळावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई