जिल्ह्यात पर्यटनस्थळांसाठी कोट्यवधींचा निधी
By Admin | Published: March 26, 2017 05:10 AM2017-03-26T05:10:37+5:302017-03-26T05:10:37+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त यंदाचे वर्ष ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत
जयंत धुळप /अलिबाग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त यंदाचे वर्ष ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. याअंतर्गत ३०.२१ कोटी रुपये खर्च करून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची २८ ठिकाणे व स्थळांचा विकास करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. यात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाकरिता प्रसिद्ध चरी गावासह महाड चवदार तळे आणि महाड क्रांतिस्तंभ या तीन ऐतिहासिक स्थळांचा समावेश असून, त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
जगाच्या पाठीवर १९३२ ते १९३९ अशी तब्बल सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे अलिबाग तालुक्यातील चरी-कोपर येथील शेतकरी संप आहे. तत्कालीन सावकारांच्या जुलूमशाही विरुद्ध चरी पंचक्रोशीतील २५ गावांतील शेतकऱ्यांनी संघटित होऊन हा संप केला होता. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले होते. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी येथे येऊन पाठिंबा दिला होता. याच शेतकरी संपामुळे ‘कूळ कायदा’ जन्मास आला, तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ‘कसेल त्याची जमीन’ नैसर्गिक न्यायाचे तत्त्व प्रस्थापित झाले. खोत, सावकार आणि जमीनदारांच्या गुलामगिरीतून येथीलच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील शेतकरी मुक्त झाला. या ऐतिहासिक शेतकरी संपाच्या अमृतमहोत्सव वर्षी २५ जानेवारी २००९ रोजी चरी येथे एक अनोखे स्मारक उभारण्यात आले. लोखंडी कुदळ (टिकाव) या शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या अवजारापासून झेप घेणाऱ्या गरूड पक्षाच्या आकाराचे अनोखे स्मारक उंबर्डे (पेण) येथील गतवर्षीचा ‘लोकमत-महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार प्राप्त शिल्पकार किशोर ठाकूर या कल्पकतेतून साकारले आहे. आता शासनाने जाहीर केलेल्या एक कोटी रुपयांच्या स्मारक विकास अनुदानातून येथे ग्रथालय, वाचनालय आणि सभागृह बांधण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून या शेतकरी संपाच्या स्मृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे.
सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा संप
१९३२ ते १९३९ अशी तब्बल सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे अलिबाग तालुक्यातील चरी-कोपर येथील शेतकरी संप आहे. तत्कालीन सावकारांच्या जुलूमशाही विरुद्ध चरी पंचक्रोशीतील २५ गावांतील शेतकऱ्यांनी संघटित होऊन हा संप केला होता. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले होते. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी येथे येऊन पाठिंबा दिला होता.
शेतकरी संपामुळे ‘कूळ कायदा’ जन्मास आला, तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ‘कसेल त्याची जमीन’ नैसर्गिक न्यायाचे तत्त्व प्रस्थापित झाले. खोत,सावकार आणि जमीनदारांच्या गुलामगिरीतून येथीलच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील शेतकरी मुक्त झाला. या ऐतिहासिक शेतकरी संपाच्या अमृतमहोत्सव वर्षी २५ जानेवारी २००९ रोजी चरी येथे एक अनोखे स्मारक उभारण्यात आले.
महाड चवदार तळे परिसर सुशोभिकरण
आणि सभागृह नूतनीकरण
च्२५ डिसेंबर १९२७ रोजीच्या महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या स्मृती चिरंतन राहून येणाऱ्या नव्या पिढीला त्यांतून स्फूर्ती प्राप्त व्हावी, या हेतूने महाड चवदार तळे परिसर सुशोभिकरण व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, त्याकरिता एक कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिला आहे. त्याचबरोबर महाडमधीलच क्रांतिभूमी येथील शाहू महाराज सभागृहाचे नूतनीकरण करण्याकरिताही एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.