मालमत्ता प्रदर्शनात ग्राहकांपेक्षा बघ्यांचीच गर्दी, कॉर्पोरेट आयोजनाचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 07:16 AM2018-01-29T07:16:56+5:302018-01-29T07:17:09+5:30

वाशी येथील सिडकोच्या भव्य एक्झिबिशन केंद्रात सुरू असलेल्या मालमत्ता प्रदर्शनाला तीन दिवसांत तब्बल ७५ हजार ग्राहकांनी भेट दिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. रविवारचा दिवस असल्याने प्रदर्शनाला भेट देणाºयांची संख्या मोठी होती;

The crowd, the charm of corporate planning, have seen more than the customers in the property exhibition | मालमत्ता प्रदर्शनात ग्राहकांपेक्षा बघ्यांचीच गर्दी, कॉर्पोरेट आयोजनाचे आकर्षण

मालमत्ता प्रदर्शनात ग्राहकांपेक्षा बघ्यांचीच गर्दी, कॉर्पोरेट आयोजनाचे आकर्षण

Next


- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : वाशी येथील सिडकोच्या भव्य एक्झिबिशन केंद्रात सुरू असलेल्या मालमत्ता प्रदर्शनाला तीन दिवसांत तब्बल ७५ हजार ग्राहकांनी भेट दिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. रविवारचा दिवस असल्याने प्रदर्शनाला भेट देणाºयांची संख्या मोठी होती; परंतु यात प्रत्यक्ष ग्राहकांपेक्षा बघ्यांचीच अधिक गर्दी दिसून आली. त्यामुळे प्रदर्शनाला भेट देणाºया प्रेक्षकांच्या संख्येवरून आर्थिक उलाढालीचे गणित मांडणाºया आयोजकांचा बनाव उघडकीस आला आहे.
क्रेडाई-बीएएनएमचे हे अठरावे वार्षिक मालमत्ता प्रदर्शन आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून अगदी कॉर्पोरेट थाटत दरवर्षी भरविण्यात येणाºया या प्रदर्शनाचे नवी मुंबईकरांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. स्टॉलची आकर्षक रचना, त्यात मांडण्यात आलेले भव्य गृहप्रकल्प, स्वागतासाठी तोकड्या कपड्यात सज्ज असलेल्या देशी-विदेशी तरुणी, नेत्रदीपक रोषणाई व सिनेतारकांची मांदियाळी आदीमुळे हे प्रदर्शन नेहमीच प्रेक्षणीय राहिले आहे.
प्रदर्शनात १२ लाखांपासून कोटीपर्यंतच्या सदनिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा दावा वर्षानुवर्षे आयोजकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे मागील सात वर्षांपासून बारा लाखांच्या घरांचा फंडा वापरला जात आहे. बजेटमधील घरांच्या नावाने सर्वसामान्यांची बोळवण केली जात आहे. कारण मागील काही वर्षात स्थावर मालमत्तेचे दर गगनाला भिडले आहेत. जमिनीच्या किमती वाढल्याने बजेटमधील गृहप्रकल्पांना खीळ बसली आहे.
कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनीवर छोट्या आकाराची बजेटमधील घरे बांधणे विकासकांना परवडत नाही. त्यामुळे विकासकांनी छोट्या आकाराच्या घरबांधणीला फाटा दिला आहे. ही वस्तुस्थिती असतानाही प्रदर्शनात बजेटमधील घरे असल्याचा पोकळ दावा आयोजकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात बांधकाम उद्योगाला मारक ठरणारे अनेक निर्णय झाले. २0१६ च्या शेवटी नोटाबंदी व त्यानंतर टप्प्याटप्प्याने जीएसटी आणि महारेरा कायदा आला. त्याचा जबरदस्त फटका रियल इस्टेट क्षेत्राला बसला.
नवीन गृहप्रकल्पाला खीळ बसली. त्याचा परिणाम म्हणून नवीन गृहप्रकल्पाच्या भानगडीत न पडता विक्रीविना वर्षानुवर्षे पडून असलेल्या सदनिका विक्रीवर अनेकांनी भर दिला. गेल्या नोव्हेंबर २0१६ मध्ये झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर लगेच डिसेंबर महिन्यात क्रेडाई-बीएएनएमने मालमत्ता प्रदर्शन भरविले. नोटाबंदीचा रियल इस्टेटवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दिखावा या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आला. भेट देणाºया ग्राहकांच्या आकड्यावरून नवी मुंबईतील स्थावर मालमत्तेला आजही चांगली मागणी असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. सध्या सुरू असलेल्या प्रदर्शनातून हेच प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून सुरू असल्याचे दिसून येते. सध्या सिडकोच्या नैना क्षेत्रात बजेटमधील घरांच्या निर्मितीला वाव आहे; परंतु विविध कारणांमुळे या क्षेत्रातही नवीन गृहप्रकल्प उभारताना दिसत नाहीत.
बांधकाम व्यवसायात गुंतवणूकदारांचा पैसा लागलेला असतो; परंतु नोटाबंदीनंतर अनेक गुंतवणूकदारांनी आखडता हात घेतला आहे. यातच विकासकांच्या चापलुसीला लगाम घालणारा महारेरा आणि करचुकवेगिरीला चपराक देणारी जीएसटी करप्रणाली लागू झाल्याने बड्या विकासकांचे कंबरडे मोडले आहे.
मात्र, त्यानंतरही सर्वकाही आलबेल असल्याचा आव विकासकाकडून आणला जात आहे. वाशी येथे सुरू असलेल्या मालमत्ता प्रदर्शनाचा थाट विकासकांच्या याच मनोवृत्तीचे प्रतीक असून, त्यामुळे बजेटमधील घराच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांची मात्र घोर निराशा होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

तीन दिवसांत प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे. यात प्रत्यक्ष खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा अधिक समावेश आहे. मागील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात घराची नोंदणी झाली आहे. ही बाब बांधकाम व्यवसायात चेतना निर्माण करणारी आहे.
- भूपेंद्र शहा, विश्वस्त अध्यक्ष, क्रेडाई-बीएएनएम

सर्वसामान्यांची पाठ : प्रदर्शनात बजेटमधील गृहप्रकल्प नसल्याची खात्री सर्वसामान्य ग्राहकांना पटली आहे. त्यामुळे काही लाखांचे बजेट असलेल्या ग्राहकांनी याअगोदरच प्रदर्शनाकडे पाठ फिरविली आहे. सध्या प्रदर्शनात दिसणारा वर्ग उच्च आर्थिक श्रेणीतला आहे. यातील प्रत्यक्ष ग्राहकही नगण्य आहेत. उर्वरित बहुतांशी जण केवळ प्रदर्शनाचा झगमगाट पाहण्यासाठी फेरफटका मारायला येत आहेत.

घरांच्या मार्केटिंगसाठी परदेशी मुली

दरवर्षी अगदी हायटेक पद्धतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. घरांच्या मार्केटिंगसाठी देश- विदेशातील मुलींना आणले जाते.

अत्याधुनिक पद्धतीने सजावट केलेल्या स्टॉलच्या स्वागत कक्षावर दिसणाºया देश-विदेशातील या मुली पाहून सर्वसामान्यांची भंबेरी उडत आहे.
आपण मालमत्ता प्रदर्शनात फिरतोय याचा अनेकांना क्षणभर विसर पडावा, असाच हा सोहळा असतो. त्यामुळे या सोहळ्यात मालमत्ता खरेदी करणाºयांपेक्षा बघ्यांचीच अधिक गर्दी असल्याचे पाहावयास मिळते.
 

Web Title: The crowd, the charm of corporate planning, have seen more than the customers in the property exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.