नवी मुंबई : नवी मुंबई शहरात लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवून नागरिक सर्रासपणे बाहेर फिरत असून, खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. वाढत्या रुग्णांमुळे संपूर्ण शहरात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे, परंतु लॉकडाऊनला न जुमानता, तसेच नियमांची पायमल्ली करून नागरिक घराबाहेर फिरत आहेत. या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस आणि महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे, परंतु विनाकारण बाहेर फिरणाºया नागरिकांवर त्याचा फारसा काही परिणाम झालेला नाही. नागरिक मोठ्या संख्येने बाहेर फिरत असून, फेरीवाल्यांचे प्रमाणही वाढले आहे. खरेदीसाठी घराबाहेर पडणारे नागरिक आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून सामाजिक अंतर राखले जात नाही.नियमांचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून कारवाया होत नसल्याचा आरोप नागरिककरीत आहेत.
शहरात नागरिकांची साहित्य खरेदीसाठी गर्दी; सामाजिक अंतराच्या नियमाचा पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 1:00 AM