नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी अवघे नवी मुंबईकर सज्ज झाले असून, बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. बहुतांश मंडळांची गणेश देखाव्यांची सजावट पूर्ण झाली आहे. घरगुती गणपतीसाठी लागणा-या फुलांच्या माळा, बाप्पाचे दागिने, वस्त्र, गणेश स्थापनेकरिता लागणारे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे.बाप्पाच्या स्वागताची जंगी तयारी सुरू असून, ढोल-ताशा पथकांना पसंती देण्यात येत आहे. शहरातील मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांनी रविवारी मूर्ती आणून सजावटीला सुरुवात केली आहे. नवी मुंबईत, पनवेल परिसरात लेझीम, झांज, झेंडा पथक प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. शहरातील गणेश मंदिरांनाही रोषणाई करण्यात आली असून, संपूर्ण शहर भक्तीमय झाले आहे. जुईनगर परिसरातील स्वयंभू गणेश मंदिराला फुलांनी सजविण्यात आले असून, गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. सीबीडीतील गणेश मंदिर, तसेच सीबीडीचा राजा मंडळाच्या वतीने महिला, तसेच मुलांसाठी दरदिवशी विविध उपक्रम, स्पर्धा राबविल्या जाणार आहेत. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या सुरक्षेसाठी गणेश मंडळांनी सीसीटीव्ही बसविले आहेत, तसेच गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी मंडळाचे स्वयंसेवक कार्यरत आहेत.बाहेरगावाहून आलेत भटजीगणेशोत्सव काळातील मूर्तीची प्रतिष्ठापना, सत्यनारायण पूजा, अथर्वशीष पठण, अभिषेक आदींकरिता भटजींची शोधाशोध सुरू होते. याकरिता नाशिक, धुळे, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी याठिकाणाहून भटजी दाखल झाले आहेत. त्यानुसार बाहेरगावातून आलेल्या एका भटजीला साधारण १५ ते २० गणपतींची आर्डर दिली जाते. एका पूजेसाठी ५०० ते १००० रुपयांची दक्षिणा मिळते. याशिवाय सत्यनारायण पूजेची वेगळी दक्षिणा दिली जाते.उत्सवादरम्यान घ्यावयाची काळजीसार्वजनिक गणेशोत्सवात असंख्य भाविक दर्शनासाठी व पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा योग्य आणि अपघातविरहित असणे आवश्यक आहे. मंडप, स्टेज व इतर साहित्य महावितरणच्या विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर असल्याची खात्री करून घेणे, आवश्यक आहे. गणेशोत्सवातील मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेणे गरजेचे आहे. गणेशोत्सवात विविध कामांसाठी करण्यात येणारी वायरिंग ही योग्य तसेच दोषविरहित असावी. गर्दीच्या ठिकाणी विजेचे वायर्स विस्कळीत स्वरूपात राहणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. मिरवणुकीदरम्यान आजूबाजूला असलेल्या उच्च व लघुदाब वाहिन्या, फिडर पिलर, रोहित्रे आदींपासून मिरवणुकीतील वाहने, देखावे सुरक्षित अंतरावर राहतील, याची काळजी प्रत्येक मंडळाने घ्यावी.गणेशोत्सवाच्या काळात वीजतारा जळणे, शॉर्टसर्किट होणे किंवा वीजव्यवस्थेत बिघाड होणे आदी घटनांची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन तातडीच्या मदतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाºयांना, कार्यकर्त्यांना २४ तास सुरू असणाºया १९१२, १८००-२००-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्र मांकावर संपर्क साधता येणार आहे.
बाप्पाच्या स्वागतासाठी शहरवासी सज्ज, पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 5:24 AM