मगरींना पाहण्यासाठी गर्दी
By admin | Published: November 15, 2015 12:03 AM2015-11-15T00:03:41+5:302015-11-15T00:03:41+5:30
महाड शहराला सावित्री नदीचा विळखा आहे. या सावित्री नदीत गेल्या काही वर्षांपासून मगरींचे वास्तव्य वाढले आहे. शहराजवळील केंबुर्ली, शेडाव डोह, कोटआळी, मिलीट्री
दासगाव : महाड शहराला सावित्री नदीचा विळखा आहे. या सावित्री नदीत गेल्या काही वर्षांपासून मगरींचे वास्तव्य वाढले आहे. शहराजवळील केंबुर्ली, शेडाव डोह, कोटआळी, मिलीट्री होस्टेल या परिसरात नदीकिनारी या मगरी स्वच्छंद फिरताना दिसतात. दुपारच्या वेळेत या मगरी नदीकाठी येतात. या मगरींना पाहण्याकरिता महामार्गावर गर्दी होऊ लागली आहे.
महाड शहराला वळसा घालून सावित्री नदी गेली आहे. २००५ मध्ये मोठ्या प्रमाणावर आलेल्या पुरात या नदीमध्ये मगरी वाहून आल्या आणि या ठिकाणीच त्यांनी आपले घर केले. हळूहळू या मगरींची संख्या वाढू लागली आहे. सावित्री नदीच्या पात्रात विविध ठिकाणी या मगरी पाहावयास मिळतात. परंतु केंबुर्ली गावाजवळील महामार्गाच्या वळणावर नदीकिनारी या मगरी कायम दिसून येतात. वनविभागाने देखील शहरातील शेडाव डोह, मिलिट्री होस्टेल, केंबुर्लीनजीक मगरपट्टा असल्याचे फलक लावून सावधानतेचा इशारादेखील दिला आहे. केंबुर्ली गावाजवळ नदीच्या मधोमध असलेल्या वाळूवर आढळतात. सुट्टीत पर्यटकांच्या गर्दीबरोबरच भाऊबीजेच्या दिवशी मगरींना पाहण्यासाठी गर्दी केली होती. (वार्ताहर)