यावर्षीही लसूणची फोडणी महागच; बाजार समितीमध्ये ९० ते २२० रुपये किलो

By नामदेव मोरे | Published: June 6, 2024 06:41 PM2024-06-06T18:41:04+5:302024-06-06T18:42:01+5:30

किरकोळ मार्केटमध्ये २८० ते ३०० रुपये किलो दराने लसूणची विक्री होत आहे.

Crushing garlic is expensive this year too 90 to 220 rupees per kg in the market committee | यावर्षीही लसूणची फोडणी महागच; बाजार समितीमध्ये ९० ते २२० रुपये किलो

यावर्षीही लसूणची फोडणी महागच; बाजार समितीमध्ये ९० ते २२० रुपये किलो

नवी मुंबई : वर्षअखेरीस लसूणच्या दरवाढीचा विक्रम झाला होता. यावर्षीही हंगामाच्या सुरुवातीपासूनच दर वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी जुनच्या सुरुवातीला बाजार समितीमध्ये लसूण ४० ते ६५ रुपये किलो दराने विकला जात होता. यावर्षी हेच दर ९० ते २२० रूपयांवर पोहचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये २८० ते ३०० रुपये किलो दराने लसूणची विक्री होत आहे.

प्रत्येक वर्षी जानेवारीमध्ये लसूणचा हंगाम सुरू होतो. जुनपर्यंत लसूणचे दर घसरत असतात. परंतु यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासूनच लसूण तेजीत आहे. राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये ८० ते २३० रुपये किलोपर्यंत दर आहेत. मुंबई बाजार समितीमध्येही गतवर्षीच्या जुन महिन्यापेक्षा बाजारभाव दुप्पट झाले आहेत. लसूणचे उत्पादन कमी झाले असल्यामुळे हा फरक पडत आहे. दिवाळीदरम्यान काही प्रमाणात दर कमी होतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईमध्ये मध्यप्रदेश, गुजरात उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश व इतर भागातून लसूण विक्रीसाठी येत असतो. सर्वात जास्त आवक मध्यप्रदेशमधून होत असते. हंगामाच्या सुरुवातीला वाढलेले भाव पाहता यावर्षीही लसूणची फोडणी महागच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

"मुंबईमध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान टप्याटप्याने नवीन मालाची आवक होत असते. यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे दर वाढले आहेत. दिवाळीदरम्यान दर कमी होतील. मुंबईत मध्यप्रदेश व इतर राज्यांमधून आवक होत असते," असे लसूण व्यापारी दिक्षीत शहा यांनी म्हटलं.

"लसूणची हंगामाच्या सुरुवातीपासून कमतरता भासत आहे. मागणीच्य तुलनेत आवक कमी होत असल्याने दर वाढले आहेत. अजून चार महिने दर तेजीत राहतील," असे कांदा लसूण मार्केट संचालक, अशोक वाळुंज म्हणाले.

राज्यातील लसूणचे प्रतीकिलो दर पुढीलप्रमाणे
बाजार समिती - बाजारभाव
मुंबई - ९० ते २२०
अहमदनगर - ८५ ते २३०
छत्रपती संभाजीनगर - ६५ ते २२०
नाशिक ११५ ते २३०
पुणे ९० ते २३०
नागपूर ५० ते १८०
सोलापूर ९० ते २५०

Web Title: Crushing garlic is expensive this year too 90 to 220 rupees per kg in the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.