शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वाशी-बेलापूरच्या पम्पिंग स्टेशनला ‘सीआरझेड’चा हिरवा कंदील

By नारायण जाधव | Published: April 03, 2023 4:37 PM

जीर्ण वास्तू तोडून नव्याने बांधणार : अंदाजे ७२ कोटी रुपये खर्च अपेक्षित

नारायण जाधवनवी मुंबई : नवी मुंबई शहर हे नेदरलँडच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे. भरतीच्या वेळी खाडीतील पाणी शहरात घुसू नये, यासाठी शहरात अंतरा-अंतरावर चॅनल काढले आहेत. त्याच धर्तीवर पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास ठिकठिकाणी ‘सिडको’ने होल्डिंग पाँडसह पम्पिंग स्टेशनही बांधली आहेत. यातील वाशी आणि बेलापूर येथील सिडकोकालीन जुने पम्पिंगचे बांधकाम तोडून त्या जागी नवे पम्पिंग बांधण्यास ‘सीआरझेड’ प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. यामुळे नवी मुंबई महापालिकेस मोठा दिलासा मिळाला आहे.

या कामावर अंदाजे ७२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली. ‘सीआरझेड’ प्राधिकरणाच्या अटीनुसार मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घेऊन दोन्ही कामांच्या निविदाप्रक्रिया पूर्ण करून कामास सुरुवात करण्यात येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केेले.

वाशी सेक्टर सेक्टर ८ मधील सर्व्हे क्रमांक १७ वर नऊ हजार चौरस मीटरचे पम्पिंग स्टेशन आहे. बेलापूर सेक्टर १२ मधील सर्व्हे क्रमांक ४६६ ए भूखंडावरील पम्पिंग स्टेशनचा एरिया सर्वांत मोठा म्हणजे १६ एकर इतका आहे. बेलापूरच्या पम्पिंग स्टेशनचे क्षेत्र मोठे असण्याचे कारण म्हणजे या पम्पिंग स्टेशनमध्ये सेक्टर १ ते ९ सह सेक्टर ११, १२ मधील पाणीही जमा होते.जीएसटीमुळे खर्च वाढलावाशीच्या पम्पिंग स्टेशनच्या बांधकामासाठी ३२ कोटी, तर बेलापूरच्या पम्पिंग स्टेशनच्या बांधकामावर ४० कोटी खर्च अपेक्षित आहे. सध्या याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र सागरकिनारा प्राधिकरणाच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. प्राधिकरणाची फेब्रुवारी महिन्यातील नियोजित १६३ वी बैठक मार्चमध्ये झाली. तीत ही मंजुरी आहे. १८ टक्के जीएसटी आणि इतर गोष्टींमुळे खर्चात वाढ झाली आहे.या बांधकामांचा आहे समावेशवाशी आणि बेलापूरच्या पम्पिंग स्टेशनचे बांधकाम सिडकोकालीन असून, कालौघात ते अतिशय जुने आणि जीर्ण झालेले आहे. यामुळे अपघात होण्याची भीती आहे. यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी दोन्ही पम्पिंग स्टेशनचे बांधकाम नव्याने करण्यात येणार आहे, त्यामध्ये जुनी प्लीन्थ तोडून नव्याने बांधणे, भिंतींचे बांधकाम करणे, इलेक्ट्रिकल कामांसह सर्व मशिनरी नव्याने बसविण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही पम्पिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील, असा आशावाद शहर अभियंता संजय देसाई यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई