सिडकोला सीआरझेडचा दिलासा, द्रोणागिरीतील २३ विकासकामांना सशर्त परवानगी

By नारायण जाधव | Published: March 27, 2023 03:41 PM2023-03-27T15:41:30+5:302023-03-27T15:42:44+5:30

२३ विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित करून सीआरझेड प्राधिकरणाने ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या १६० व्या बैठकीत सिडकोकडून खुलासा मागितला होता.

CRZ relief to CIDCO, conditional permission for 23 development works in Dronagiri | सिडकोला सीआरझेडचा दिलासा, द्रोणागिरीतील २३ विकासकामांना सशर्त परवानगी

सिडकोला सीआरझेडचा दिलासा, द्रोणागिरीतील २३ विकासकामांना सशर्त परवानगी

googlenewsNext

नवी मुंबई : सिडकोने सध्या उलवे, द्राेणागिरीतील विकासावर लक्ष केंद्रित करून येथील कांदळवन आणि ५० मीटर बफर झोनमध्ये हाती घेतलेल्या विविध २३ विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित करून सीआरझेड प्राधिकरणाने ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या १६० व्या बैठकीत सिडकोकडून खुलासा मागितला होता.

यात पावणे दोन लाख चौरस मीटर खारफुटी बाधित होणार आहे. त्यावर सिडकोने खुलासा केला असून त्यावर समाधान झाल्याने आता सीआरझेडने नुकतीच दिली आहे. यामुळे सिडकोस मोठा दिलासा मिळून द्रोणागिरीचा विकास आता सुसाट होण्यास मदत होणार आहे.

संपूर्ण नवी मुंबई शहर हे ठाणे खाडीमुळे सीआरझेडच्या परिघात मोडते. यामुळे या शहरात कोणतीही विकासकामे करताना नवी मुंबई, पनवेल महापालिका असो वा सिडको महामंडळ अथवा एमएमआरडीए या प्रत्येकाला ही कामे विकासकामे करण्यासाठी महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाची अर्थात सीआरझेडची मान्यता घ्यावी लागते. अशाच प्रकारे सिडकोने द्राेणागिरी नोडमधील ५० मीटर बफर झोनमधील विविध २३ विकासकामांसाठी सीआरझेडची परवानगी मागितली होती. या विकासकामांमध्ये तीन कामे सीव्हरेज ट्रिटमेंट प्लान्ट, पंप हाऊसची आहेत. तर, सेक्टर-५१,५२ आणि ५५,५६ मधील होल्डिंग पाॅडवरील पूल, २२ मीटरचा नाला बांधणे, आठ नाल्यांची सफाई, आठ सेवा रस्त्यांचे बांधकाम यांचा समावेश आहे.

या प्रश्नांची उत्तरे मागितली होती
ऑगस्ट २०२२ मध्ये १६० व्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव चर्चेसाठी आला असता सीआरझेड प्राधिकरणाने सिडकोकडून ठोस खुलासा व स्पष्टीकरण मागितले होते. यात प्राधिकरणाने म्हटले आहे, सिडकोने ही कामे आधीच पूर्ण केली आहेत काय. की सिडको नव्याने परवानगी मागत आहे, की कार्योत्तर मंजुरी मागत आहे. त्यावर सिडकोने यापैकी कोणतेही काम आम्ही सुरू केले नसून प्राधिकरणाच्या परवानगीनंतरच ते करण्यात येईल, असा खुलासा केला आहे.

ही आहेत कामे
१ -सीव्हरेज ट्रिटमेंट प्रकल्प
सेक्टर ५६ व ५९ मध्ये ६१६९८ चौरस मीटर क्षेत्रात १०८ एमएलडी क्षमतेचा सीव्हरेज ट्रिटमेंट बांधण्यात येणार असून त्यात खारफुटी जाणार आहे. हा परिसर सीआरझेड १ ए मध्ये मोडतो. तर सेक्टर ५१ ए मध्ये ५९१५ चौरस मीटर जागेवर पंप हाऊस बांधण्यात येत असून यात ही खारफुटी बाधित होणार आहे.
२- सेवा रस्त्यांचे बांधकाम
विविध रस्त्यांसाठी सेक्टर १५ मध्ये ४३२२ चौरस मीटर, १५ ए मध्ये ७३३४ चौरस मीटर, सेक्टर ४१ मध्ये २३९१ चौरस मीटर, चौरस मीटर, सेक्टर ४८ मध्ये ५८९६ चौरस मीटर, सेक्टर ५० मध्ये २९८४ चौरस मीटर, सेक्टर ५६ मध्ये १५४५० चौरस मीटर, सेक्टर १५ मधील एसटीपी शेजारी २८६९ चौरस मीटर, सेक्टर २७ मध्ये सीआरझेड क्षेत्र बाधित होत आहे.
३- नाल्यांची स्वच्छता
सिडकोने सेक्टर ४७ ते ५५ मध्ये नाल्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला असून यात मोठ्या प्रमाणात खारफुटी बाधित होणार आहे.
हे क्षेत्र सीआरझेडच्या ५० मीटर बफर झोनमध्ये मोडते. यात सेक्टर ४७ मध्ये १०४८८ चौरस मीटर, सेक्टर ४८ मध्ये ४५१७ चौरस मीटर, सेक्टर ५० मध्ये ८३७६ चौरस मीटर, सेक्टर ५१ मध्ये १२०९६ चौरस मीटर, सेक्टर ५२ आणि सेक्टर ५३ मध्ये प्रत्येकी ७७८९ चौरस मीटर तर सेक्टर ५४ आणि ५५ मध्ये प्रत्येकी ८२९० चौरस मीटर असे एक लाख ७० हजार ६३१ चौरस मीटर खारफुटी क्षेत्र बाधित होत आहे.

Web Title: CRZ relief to CIDCO, conditional permission for 23 development works in Dronagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.