शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

सीटी स्कॅन सुविधा कागदावरच

By admin | Published: July 10, 2015 3:08 AM

सुपर स्पेशालिटी आरोग्य सेवा पुरविण्याचा टेंभा मिरविणाऱ्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे.

नवी मुंबई : सुपर स्पेशालिटी आरोग्य सेवा पुरविण्याचा टेंभा मिरविणाऱ्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. एमआरआय आणि सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. मात्र संबंधित विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे ही महत्त्वपूर्ण सुविधा केवळ कागदावरच राहिली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांचे फावले असून एमआरआय आणि सीटी स्कॅनसाठी रुग्णांची अक्षरश: लूट सुरू आहे. पालिकेच्या वाशी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दिवसाला १२०० ते १५०० रुग्ण येतात. त्यापैकी सरासरी २५ ते ३० रुग्णांना एमआरआय किंवा सीटी स्कॅनची गरज भासते. प्रथम संदर्भ रुग्णालयात ही सुविधा नसल्याने अशा रुग्णांना शेजारच्या हिरानंदानी किंवा इतर खासगी रुग्णालयांकडे पाठविले जाते. खासगी रुग्णालयात एमआरआयसाठी ५००० ते ६५०० रुपये तर सीटी स्कॅनसाठी २००० ते २५०० रुपये आकारले जातात. हे थांबवण्यासाठी पालिका रुग्णालयांत सीटी स्कॅन सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. सर्वसाधारण सभेत तसा ठरावही झाला होता. चालू अर्थसंकल्पात १७ कोटी रुपयांची तरतूदही आहे. असे असतानाही एमआरआय आणि सीटी स्कॅन मशिन बसविण्यासाठी रुग्णालयात जागा नसल्याच्या कारणावरून हा प्रस्ताव रखडल्याचे समजते. तांत्रिक अडचणीमुळे सीटी स्कॅन आणि एमआरआय मशिनचा जुना प्रस्ताव बारगळला आहे. आउटसोर्सिंगमधून ही सेवा देण्याचा सुधारित निर्णय घेण्यात आला. प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांनी दिली. (प्रतिनिधी)> महापालिकेच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेच्या दर्जाबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, ड्युटीवर असणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे रुग्णांबरोबरचे वर्तन आदी विविध कारणांमुळे महापालिकेची आरोग्य सेवा नेहमीच वादात सापडली आहे. एकूणच नवी मुंबईकरांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे सत्ताधाऱ्यांचे आश्वासन फोल ठरले आहे.