प्रभाग आरक्षणाविषयी उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 01:39 AM2019-12-27T01:39:37+5:302019-12-27T01:39:51+5:30

सर्वपक्षीय इच्छुकांचे ठरणार भवितव्य : नवीन वर्षामध्येच काढली जाणार सोडत

Curious about ward reservation in navi mumbai | प्रभाग आरक्षणाविषयी उत्सुकता शिगेला

प्रभाग आरक्षणाविषयी उत्सुकता शिगेला

Next

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभाग आरक्षणाविषयी नगरसेवकांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आरक्षणावर अनेकांचे भवितव्य निश्चित होणार आहे. कोणाला फटका बसणार व कोणाला लॉटरी लागणार? यावरून शहरभर चर्चा सुरू झाली असून नवीन वर्षामध्येच आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी पंचवार्षिक निवडणूक जवळ आली आहे. निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत डिसेंबरमध्ये काढणे आवश्यक होते. निवडणूक विभागाच्या वतीने १७ डिसेंबरला सोडत काढण्यात येणार होती; परंतु शासनाने हिवाळी अधिवेशनामध्ये बहु-सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून एकसदस्यीय प्रभाग करण्याचे विधेयक मंजूर केले आहे. यामुळे प्रस्तावित सोडत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन कायद्याप्रमाणे निवडणूक विभागाच्या वतीने पुढील कार्यवाही सुरू होणार असून, जानेवारीमध्येच सोडत घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सोडत कधी निघणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षाच्या नेत्यांसह महापालिकेच्या अधिकाºयांकडेही याविषयी विचारणा केली जात आहे.
जुन्या पद्धतीने रचना झाली असती तर ३० डिसेंबरपर्यंत सूचना व हरकती मागवून सर्व सोपस्कार पूर्ण झाले असते; परंतु आता जानेवारीमध्ये आरक्षणाविषयी नवीन तारीख निश्चित केली जाणार आहे. प्रत्यक्ष सोडत व सूचना हरकती यासाठी किमान १२ ते १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

बहु-सदस्यीय प्रभाग पद्धत रद्द झाल्यामुळे अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. कोणत्या प्रभागामध्ये आरक्षण पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही आरक्षणाचा फटका अनेकांना बसला आहे. आरक्षणावरून नाराजीही पाहावयास मिळत असते. गतवेळी सारसोळे गाव प्रभाग ८६ मध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाला होता. या ठिकाणी या प्रवर्गातील सक्षम उमेदवारही उपलब्ध न झाल्यामुळे प्रमुख पक्षांनाही बाहेरून उमेदवार आयात करावा लागला होता. अशाच पद्धतीने इतर अनेक ठिकाणी आरक्षणाचा फटका बसला होता. ५० टक्के महिला आरक्षण असल्यामुळे ज्या ठिकाणी पुरुष नगरसेवक आहे तेथे महिला आरक्षण असणार आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांच्या होर्डिंगवर स्वत:सोबत पत्नीची छायाचित्रेही दिसू लागली आहेत. आपल्याला नाही निवडणुकीला उभे राहता आले तरी घरातीलच कोणाला तरी उमेदवारी मिळावी यासाठीची तयारी सुरू केली आहे.

कार्यालये पुन्हा सुरू
च्महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच पाच वर्षांपूर्वी बंद झालेल्या अनेक पदाधिकाºयांची कार्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. अनेकांनी प्रभागामध्ये पूर्ण वेळ जनसंपर्क कार्यालये सुरू केली आहेत. विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर कार्यालयांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

होर्डिंगवरील छायाचित्र संख्या वाढली
च्निवडणुकांची चाहूल लागल्यापासून राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांच्या होर्डिंगवरील छायाचित्रे वाढली आहेत. प्रभाग महिलांसाठी आरक्षित होण्याची शक्यता असल्यामुळे परिवारातील महिलांची छायाचित्रे दिसू लागली आहेत. उमेदवारी घरातील सदस्याला मिळावी, यासाठी अट्टहास सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
पत्रकांची संख्याही वाढली
च्निवडणुकांची चाहूल लागताच अनेक पदाधिकाºयांनी प्रभागांमध्ये विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केले आहेत. देवदर्शनासाठी सहलींचेही आयोजन सुरू केले आहे. काहींनी आंदोलने करून लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. काही हौशींनी प्रभागांमधील समस्यांविषयी पत्रके तयार करून महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये पाठवून प्रसिद्धी मिळविण्यास सुरुवात केली आहे.
 

Web Title: Curious about ward reservation in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.