अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे कर्करुग्णांचा त्रास होणार कमी; ३५० कोटी रुपयांची एक हजार टनांची यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 05:07 AM2020-01-30T05:07:22+5:302020-01-30T05:07:47+5:30

विशेष म्हणजे, जगभरात सर्वत्र अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली ही उपचार पद्धती दक्षिण आशियामध्ये खारघर टाटा एक्ट्रेक्टच्या माध्यमातून प्रथमच वापरली जाणार आहे.

Cutting edge cancer due to sophisticated treatment methods; One thousand tonne system worth Rs. 1 crore | अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे कर्करुग्णांचा त्रास होणार कमी; ३५० कोटी रुपयांची एक हजार टनांची यंत्रणा

अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे कर्करुग्णांचा त्रास होणार कमी; ३५० कोटी रुपयांची एक हजार टनांची यंत्रणा

Next

- वैभव गायकर

पनवेल : खारघरमधील टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये लवकरच कर्करुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार पद्धतीचा वापर केला जाणार आहे. प्रोटॉन थेरपी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याकरिता केला जाणार आहे. यामुळे कर्करुग्णांचा मोठ्या प्रमाणावर त्रास कमी होणार आहे. विशेष म्हणजे, जगभरात सर्वत्र अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली ही उपचार पद्धती दक्षिण आशियामध्ये खारघर टाटा एक्ट्रेक्टच्या माध्यमातून प्रथमच वापरली जाणार आहे.
प्रोटोन थेरॅपी ही कर्करुग्णांना दिली जाणारी सर्वात महागडी अशी उपचार पद्धती आहे. कर्करुग्णांच्या पेशींना नष्ट करण्यासाठी रेडिएशन दिले जाते. परंपरागत चालत आलेल्या रेडिएशनचा उपचार पद्धतीत कर्करुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रोगी पेशींसह निरोगी पेशीदेखील यामुळे मृत पावत असल्याने घातक परिणाम कर्करुग्णांवर होतो. या वेळी अनेक रुग्णांचे केसदेखील गळत असतात. मात्र, नव्याने अवगत झालेल्या प्रोटॉन थेरपीमुळे रुग्णांना होणार त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सुमारे ३५० कोटी रुपयांची एका हजार टनांची ही यंत्रणा आहे. अमेरिकेत याच थेरपीसाठी किमान ७० लाख रुपये मोजावे लागतात. भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या मदतीने ही यंत्रणा खारघर टाटा रुग्णालयात उभारण्यात येत आहे. संबंधित यंत्रणा कार्यान्वित होण्यास अद्याप सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती खारघर टाटा एक्ट्रेक्ट सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी दिली.

- या थेरपीमुळे कर्करुग्णांना होणारा केसगळती, अंगदुखीचा त्रास कमी होणार आहे. विशेष म्हणजे, रेडिएशनमुळे निरोगी पेशींना होणारी इजा यामुळे कमी होणार आहे.
आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत स्वरूपात हे उपचार खारघर येथे दिले जाणार आहेत. दिवसभरात सुमारे ३० ते ४० रुग्णांना या ठिकाणी प्रोटॉन थेरपी दिली जाणार आहे. ६५०० चौरस फूट जागेमध्ये ही यंत्रणा ठेवली जाणार आहे.

सुमारे ३५० कोटी रुपयांची एका हजार टनांची ही यंत्रणा आहे. अत्याधुनिक स्वरूपाची ही प्रोटॉन थेरपी आहे. देशात प्रथमच सरकारी रुग्णालयात ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या मदतीने ही यंत्रणा खारघर टाटा रुग्णालयात उभारण्यात येत आहे. संबंधित यंत्रणा कार्यान्वित होण्यास अद्याप सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागेल.
- सुदीप गुप्ता, संचालक, खारघर टाटा एक्ट्रेक्ट सेंटर

Web Title: Cutting edge cancer due to sophisticated treatment methods; One thousand tonne system worth Rs. 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.