प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; IMD ने दिला नवा अलर्ट

By नारायण जाधव | Published: May 24, 2024 03:57 PM2024-05-24T15:57:41+5:302024-05-24T16:01:40+5:30

कोकण, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा  हवामान विभागाचा अंदाज.

cyclone will hit with great speed imd issued a new alert for konkan marathwada and vidarbha | प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; IMD ने दिला नवा अलर्ट

प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; IMD ने दिला नवा अलर्ट

नारायण जाधव, नवी मुंबई : महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरूच आहे. या पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे. या पावसाची तीव्रता आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, चक्रीवादळाची निर्मीती होत आहे. चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील किनारपट्टी प्रदेशात मोठ्या हवामान बदलाची शक्यता आहे.

 येत्या दोन ते तीन दिवसांत या वादळाचा काहीप्रमाणात तडाखा हा राज्याला देखील बसू शकतो. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

कोकण, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाजः

कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा बसताना दिसत आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. कोकण, मराठवाड्यासह विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त इतर भागात उष्णतेच्या झळा बसण्याची शक्यता असून काही ठिकाणी तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी  तर उत्तर कोकण आणि  उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ हलका ते  मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार असून हलका ते  मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे.राज्यात एकीकडे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना विदर्भात सलग आठवडाभर पावसाची हजेरी लागताना दिसत आहे. पुढील तीन दिवसही विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह  30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: cyclone will hit with great speed imd issued a new alert for konkan marathwada and vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.