भिवंडीत दररोज गरीबांची लाखोंची लूट

By Admin | Published: August 9, 2015 11:05 PM2015-08-09T23:05:44+5:302015-08-09T23:05:44+5:30

एमएमआरडीएच्या निधीतून शहरांत पालिकेने बांधलेल्या शौचालयात बेकायदेशीररित्या शहराबाहेरचे चालक नेमून पालिका प्रशासनाने गरीबांची लाखो रूपयांची लूट सुरू ठेवली आहे

Daily loot of millions of poor people | भिवंडीत दररोज गरीबांची लाखोंची लूट

भिवंडीत दररोज गरीबांची लाखोंची लूट

googlenewsNext

भिवंडी : एमएमआरडीएच्या निधीतून शहरांत पालिकेने बांधलेल्या शौचालयात बेकायदेशीररित्या शहराबाहेरचे चालक नेमून पालिका प्रशासनाने गरीबांची लाखो रूपयांची लूट सुरू ठेवली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला मनपा प्रशासनाने केराची टोपली दाखवून शौचालय चालकांना अभय दिले आहे.
मुंबई महानगर विकास क्षेत्र प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत शहरांत गोरगरीब व यंत्रमाग कामगारांच्या कुटुंबांसाठी बांधलेल्या निर्मल शौचालय व वस्ती शौचालयासाठी सुमारे ७०-८० कोटी रूपयांचा निधी खर्च झाला. सदरचा निधी पालिकेस देताना एमएमआरडीए ने दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या संस्थेने शौचालय चालविण्यासाठी त्याच भागात राहणाऱ्या नागरिकांचे समूह गट नेमायला हवे होते. परंतु, तसे न घडता पालिकेच्या बांधकाम विभागाने हस्तक्षेप करून बेकायदेशीररित्या शहराबाहेरचे ठेकेदार नेमले आहेत. ते परिसरांतील सर्व रहिवाशांकडून एका वेळेचे दोन रूपये घेऊन त्यांची लूट करीत आहेत. या बाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी देऊनही मनपा प्रशासन जागचे हालत नाही. ‘आम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांना तसेच परिसरांतील नगरसेवकांना देखील हप्ते देतो’, असे चालकांचे कामगार गुर्मीत नागरिकांना सांगत असतात. पालिकेच्या वातानुकुलीत कार्यालयात बसलेल्या अधिकाऱ्यांनी शौचालय चालकांना नोटीसा बजावून एक महिना झाला तरी चालकांच्या कामकाजात कोणताही बदल झालेला नाही. या बाबत गायत्रीनगर येथील रहिवाशांंनी दोन वर्षापासून पालिकेत तक्रारी करून व खेटे घालूनही प्रशासनाने व एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Daily loot of millions of poor people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.