शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
2
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
3
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
4
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
5
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
6
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
7
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
8
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
9
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
10
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
11
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
12
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
13
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
14
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
15
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
16
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
17
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
18
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
19
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
20
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

भिवंडीत दररोज गरीबांची लाखोंची लूट

By admin | Published: August 09, 2015 11:05 PM

एमएमआरडीएच्या निधीतून शहरांत पालिकेने बांधलेल्या शौचालयात बेकायदेशीररित्या शहराबाहेरचे चालक नेमून पालिका प्रशासनाने गरीबांची लाखो रूपयांची लूट सुरू ठेवली आहे

भिवंडी : एमएमआरडीएच्या निधीतून शहरांत पालिकेने बांधलेल्या शौचालयात बेकायदेशीररित्या शहराबाहेरचे चालक नेमून पालिका प्रशासनाने गरीबांची लाखो रूपयांची लूट सुरू ठेवली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला मनपा प्रशासनाने केराची टोपली दाखवून शौचालय चालकांना अभय दिले आहे.मुंबई महानगर विकास क्षेत्र प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत शहरांत गोरगरीब व यंत्रमाग कामगारांच्या कुटुंबांसाठी बांधलेल्या निर्मल शौचालय व वस्ती शौचालयासाठी सुमारे ७०-८० कोटी रूपयांचा निधी खर्च झाला. सदरचा निधी पालिकेस देताना एमएमआरडीए ने दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या संस्थेने शौचालय चालविण्यासाठी त्याच भागात राहणाऱ्या नागरिकांचे समूह गट नेमायला हवे होते. परंतु, तसे न घडता पालिकेच्या बांधकाम विभागाने हस्तक्षेप करून बेकायदेशीररित्या शहराबाहेरचे ठेकेदार नेमले आहेत. ते परिसरांतील सर्व रहिवाशांकडून एका वेळेचे दोन रूपये घेऊन त्यांची लूट करीत आहेत. या बाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी देऊनही मनपा प्रशासन जागचे हालत नाही. ‘आम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांना तसेच परिसरांतील नगरसेवकांना देखील हप्ते देतो’, असे चालकांचे कामगार गुर्मीत नागरिकांना सांगत असतात. पालिकेच्या वातानुकुलीत कार्यालयात बसलेल्या अधिकाऱ्यांनी शौचालय चालकांना नोटीसा बजावून एक महिना झाला तरी चालकांच्या कामकाजात कोणताही बदल झालेला नाही. या बाबत गायत्रीनगर येथील रहिवाशांंनी दोन वर्षापासून पालिकेत तक्रारी करून व खेटे घालूनही प्रशासनाने व एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. (प्रतिनिधी)