कळंबोली : कामोठे वसाहतीतील पोलीस स्टेशनजवळ असलेल्या रोजबाजारामधील टाकाऊ वस्तू बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावर डम्प केल्या जात आहे. त्यामुळे या जागेला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या ठिकाणी व्यवसाय करणाºया विक्रे त्यांकडून अस्वच्छता केली जात आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनही प्रशासनाकडे वर्ग झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, तसेच घाण केल्यानंतर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे; परंतु असे असताना कामोठे पोलीस स्टेशनजवळ असलेल्या मोकळ्या भूखंडावर कचरा टाकला जात आहे. या ठिकाणी असलेल्या रोजबाजारवर सिडकोने कारवाई केली होती. मात्र, पुन्हा बाजार बसविण्यात आला आहे.संबंधित विके्र त्यांचे पुनर्वसन ऐरणीवर आहे. त्याबाबत महापालिका धोरण ठरवीत आहे. संबंधित विक्रेत्यांकडून परिसरात घाण केली जात आहे. बाजूला असलेल्या भूखंडावर वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्र म होतात. तिथेच उरलेली भाजी, फळे, मासळी, आणि इतर वस्तू टाकल्या जातात. तसेच रस काढून उरलेला उसाचा चोथाही तिथे डम्प केला जातो. काही जुन्या हातगाड्या तिथे टाकण्यात आल्या. आतमध्ये प्रवेश करायच्या ठिकाणी हातगाड्या लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सेक्टर ११मध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. बाजूला असलेल्या वसंत बहार सोसायटीतील रहिवाशांना त्रास होत आहे. मैदानात डम्प करण्यात आलेला टाकाऊ माल सडून त्याची दुर्गंधी येत असल्याचे सदनिकाधारकांचे म्हणणे आहे.मोकळ्या भूखंडावर कोणी कचरा टाकत असेल तर ही बाब गंभीर आहे. त्यानुसार स्थानिक प्रभाग अधिकाºयांना सूचना दिल्या जातील आणि कचरा टाकणाºयांवर कारवाई केली जाईल, तसेच हा भूखंड साफसुद्धा करण्यात येईल.- डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महापालिका