शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

गणेशोत्सवातील वीजचोरीवर दामिनींचा वॉच

By admin | Published: August 30, 2015 9:24 PM

मागील वर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात चोरुन वीज वापरणाऱ्यांवर महावितरणचे दामिनी पथक वॉच ठेवणार आहे. चोरुन वीज वापरण्याऐवजी गणेशोत्सव मंडळांनी तात्पुरत्या स्वरुपात

ठाणे : मागील वर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात चोरुन वीज वापरणाऱ्यांवर महावितरणचे दामिनी पथक वॉच ठेवणार आहे. चोरुन वीज वापरण्याऐवजी गणेशोत्सव मंडळांनी तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीज कनेक्शन घेऊन निर्वीघ्नपणे हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.गणेशोत्सवाच्या काळात गेल्या काही वर्षात अनधिकृतपणे वीज जोडणी घेऊन उत्सव साजरा केला जात असल्याचे प्रमाण वाढले होते. त्याला आळा बसावा यासाठी महावितरणने दामिनी या विशेष पथकाची निर्मिती करुन त्याद्वारे चोरुन वीज वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार मागील वर्षी या पथकाने गणेशोत्सवाच्या काळात जनमित्रांच्या सहाय्याने वीजचोरीचे १० प्रकार ठाणे महापालिका हद्दीत पकडले होते. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही स्वरुपाचे दंड न आकारता त्यांना तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीज जोडणी दिली होती. त्यानुसार यंदाही हे पथक अशा चोरुन वीज वापरणाऱ्या मंडळांवर आपली करडी नजर ठेवणार आहे. या पथकात कार्यकारी अभियंत्याबरोबर अन्य चार ते पाच कर्मचारी वर्ग काम करीत आहेत.महावितरणने उचलेल्या या पावलामुळे २०११ पासून ठाण्यासह विविध भागातील गणेश मंडळांनी अधिकृत जोडणी घेणे पसंत केले आहे. मागील चार वर्षात हे प्रमाण अधिकच वाढल्याने या काळात आता वीज चोरीचे प्रमाण कमी झाले असल्याचा दावा महावितरणने केला आहे. २०११ मध्ये ठाणे मंडळातील २५५ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी अधिकृतपणे तात्पुरत्या स्वरुपात वीज जोडणी करुन घेतली होती. तर २०१२ मध्ये २७२, तसेच २०१३ मध्ये ४५५ तर २०१५ मध्ये ४८० गणेश मंडळांनी अधिकृत वीजपुरवठा घेतला होता.दरम्यान आकडे टाकून तसेच अनधिकृत वीज घेण्याच्या प्रकारामुळे अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे गणेश मंडळांनी आॅनलाईन अथवा परिसरातील महावितरणच्या कार्यालयात जाऊन हंगामी स्वरुपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज करुन जोडणी घ्यावी व उत्सव साजरा करावा असे आवाहन भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता करपे यांनी केले आहे. वीज चोरांवर दामिनी पथकाची करडी नजर राहणार असून दोषी मंडळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे यंदा वीजजोडणी घेणाऱ्या मंडळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.