डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न जेएनपीटीने सोडवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 02:53 AM2018-10-21T02:53:52+5:302018-10-21T02:53:56+5:30

जेएनपीटी प्रकल्पबाधित महालण विभागातील ग्रामपंचायतीचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी जेएनपीटी बंदर प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जसखार गावचे सरपंच दामूशेठ घरत यांनी केली आहे.

Damping Ground Question JNPT Resolve | डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न जेएनपीटीने सोडवावा

डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न जेएनपीटीने सोडवावा

Next

- मधुकर ठाकूर 

उरण : जेएनपीटी प्रकल्पबाधित महालण विभागातील ग्रामपंचायतीचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी जेएनपीटी बंदर प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जसखार गावचे सरपंच दामूशेठ घरत यांनी केली आहे.
उरण तालुक्यातील जसखार, सोनारी, करळ, नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, फुंडे, नवघर, पागोटे, धुतूम, चिर्ले, जासई आदी ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी सिडकोने जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी संपादित केलेल्या आहेत; परंतु येथील गावठाण विस्ताराचा, नागरी समस्यांचा, रोजगाराचा, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. त्यामुळे येथील ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
देशात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाला प्रतिसाद देत जेएनपीटी प्रशासनाने बंदर परिसर, जेएनपीटी वसाहतीमध्ये स्वच्छता पंधरवडा अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे अशा बंदरातील अधिकारी, कर्मचारी वर्गाचे ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पगस्त नागरिक आभार व्यक्त करीत आहेत; परंतु बंदर प्रशासनाने स्वच्छता अभियानातील गोळा करण्यात आलेला कचरा प्रकल्पगस्त बाधित ग्रामपंचायत परिसरात टाकल्याने त्याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे.
जेएनपीटी प्रकल्प बाधित ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी सिडको व जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने गेली २५ वर्षे पुढाकार न घेतल्याने या ग्रामपंचायत हद्दीतील केर कचरा टाकायचा कुठे? असा प्रश्न ग्रामपंचायतीना सतावत आहे. तरी जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने बंदर वसाहत जेएनपीटी बाधित ग्रामपंचायतींना नेहमीच सतावणारा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जसखार गावचे सरपंच दामूशेठ घरत यांनी लावून धरली आहे.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, नागरीकरणामुळे भविष्यात येथील ग्रामपंचायत परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच वाढती रहदारी, अवजड वाहतुकीमुळे या ठिकाणी अनेक समस्या उद्भवत असून, याबाबतही वेळीच दखल घेण्याची मागणी घरत यांनी केली आहे.

Web Title: Damping Ground Question JNPT Resolve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.