पनवेलमधील ३६ गावांना पुराचा धोका

By admin | Published: June 29, 2015 05:15 AM2015-06-29T05:15:58+5:302015-06-29T05:15:58+5:30

तालुक्यातील ३६ गावांना पुराचा धोका असल्याची शक्यता तहसील कार्यालयाने वर्तवली आहे.

The danger of flood of 36 villages in Panvel | पनवेलमधील ३६ गावांना पुराचा धोका

पनवेलमधील ३६ गावांना पुराचा धोका

Next

पनवेल : तालुक्यातील ३६ गावांना पुराचा धोका असल्याची शक्यता तहसील कार्यालयाने वर्तवली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानेही वादळ, भूकंप, भूस्खलन, आग यापैकी पनवेलला पुराचा अधिक धोका असल्याचे आपल्या आराखड्यात नमूद केले आहे.
पनवेल शहरातून कासाडी, गाढी, घोट, लेंढी, वाजापूर, पाताळगंगा, उसर्ली, किकरी आदी नद्या वाहतात. या नदीकिनारी अनेक गावे वसली आहेत. सलग दोन - चार दिवस मुसळधार पाऊस झाल्यास नद्या धोक्याची पातळी ओलांडतात आणि हे पाणी पनवेल शहरात घुसते. त्यामुळे शहरातील सखल भागातही पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. २६ जुलै २00५ साली तालुक्यात अशाच प्रकारे महाप्रलय आला होता. शहराबरोबरच तळोजे मजकूर, घोटगाव, पोयंजे मंडळातील आपटे, गुळसुंदे, हरिग्राम धोदाणी ही गावे बाधित झाली होते. १७ जुलै २00९ रोजी वावंजे येथील १६ घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. तसेच आपटे गावामध्येही पातळगंगा नदीला पूर आल्याने मोठे नुकसान झाले होते.

पूरग्रस्त क्षेत्र
पालीदेवद, आसुडगाव, विचुंबे, काळुंद्रे, उसर्ली खुर्द, नौपाडा, पनवेल शहर (पटेल, कच्छी मोहल्ला, बावन बंगला, साईनगर, मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी), वडघर, करंजाडे, वाघिवली, कोळखे, पळस्पे, शिरवली, महोदर, चिंध्रन, धोदानी, चिपळे, केवाळे, हरिग्राम, वावेघर, गुळसुंदे, तुराडे, आपटे, कालीवली, कराडे खुर्द, पडघे, नावडे, कळंबोली वसाहत, तळोजा पाचनंद, घोटगाव.
मागील वेळच्या पुराचा अनुभव व माहिती घेऊन विशेष खबरदारी घेतली आहे. त्याचबरोबर उपाययोजना म्हणून वेळोवेळी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त ग्रामीण व शहरी भागात आपत्ती जोखीम समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत.
- दीपक आकडे, तहसीलदार, पनवेल

Web Title: The danger of flood of 36 villages in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.