शिरवणेमधील धोकादायक इमारत केली खाली
By नामदेव मोरे | Published: July 31, 2024 11:31 PM2024-07-31T23:31:18+5:302024-07-31T23:31:28+5:30
६१ नागरिकांना निवारा केंद्रात हलविले: दुर्घटना होऊ नये यासाठी महानगर पालिकेची उपाययोजना
लोकमत न्यूज नेटवर्क , नवी मुंबई: नेरूळ विभागातील शिरवणे सेक्टर 1 मधील धोकादायक इमारत महानगर पालिकेने खाली केली आहे. 12 कुटुंबातील 61 नागरिकांना मनपाच्या निवारा केंद्रात हलविले आहे.
बेलापूर शहाबाज येथील इमारत दुर्घटनेनंतर महानगर पालिका प्रशासनाने अतिधोकादायक इमारती खाली करण्यास सुरूवात केली आहे. आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी सर्व धोकादायक इमारतींची पहाणी करण्याच्या सुचना अधिका-यांना दिल्या आहेत. शिरवणे येथील दोन मजली इमारत अतिधोकादायक झाली आहे. इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने तेथील रहिवाशांना इमारत खाली करण्यास सांगितले आहे. सर्वांना 61 नागरिकांची जुईनगर सेक्टर 23 मधील समाज मंदिरात राहण्याची व्यवस्था केली आहे.त्यांना जेवण व इतर मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासाठी दोन अधिका-यांची नियुक्ती केली आहे.