धोकादायक चिपळे पुलाची डागडुजी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 01:01 AM2019-01-24T01:01:50+5:302019-01-24T01:01:59+5:30

गाढी नदीवर बांधण्यात आलेला चिपळे पूल धोकादायक अवस्थेत असून, या पुलाच्या खालील बाजूस असणाऱ्या लोखंडी सळ्या दिसू लागल्या होत्या.

Dangerous Chihely Bridge Repair Work Continues | धोकादायक चिपळे पुलाची डागडुजी सुरू

धोकादायक चिपळे पुलाची डागडुजी सुरू

Next

- मयूर तांबडे

पनवेल : गाढी नदीवर बांधण्यात आलेला चिपळे पूल धोकादायक अवस्थेत असून, या पुलाच्या खालील बाजूस असणाऱ्या लोखंडी सळ्या दिसू लागल्या होत्या. ‘लोकमत’ने याविषयी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम सुरू केले असून, पुढील चार महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे.
बांधकाम विभागाने १९७५ मध्ये बांधण्यात आलेल्या येथील चिपळे पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. पनवेल तालुक्यातील गाढी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाला २००५ मध्ये आलेल्या पुराचा मोठा तडाखा बसला होता. या पुरामुळे पुलाचे नुकसान झाले होते. या चिपळे पुलाचा नेरे, चिपळे, वाजे, गाढेश्वर, धोदाणी, मालडुंगे या परिसरात जाण्यासाठी उपयोग केला जातो. या पुलाच्या खालील बांधकामाचे स्टील उघडे पडले असून ते गंजू लागले आहे. त्यामुळे हा धोकादायक बनला असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. हा पूल खचण्याची भीती येथील नागरिकांना वाटत होती.
या पुलाची डागडुजी केली नाही, तर भविष्यात मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. स्टील गंजू लागल्याने हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली होती, त्यामुळे धोकादायक झालेल्या या पुलाची लवकरात लवकर डागडुजी करण्याची मागणी ‘लोकमत’च्या माध्यमातून करण्यात आली होती.
‘नैना’ क्षेत्रात येणाºया व नेरे परिसरात जाण्यासाठी हा एकमेव पूल आहे. या पुलाचे आयुष्यमान ५० वर्षे असून, सद्यस्थितीत या पुलाला ४३ वर्षे होऊन गेलेली आहेत. परिसरात नगरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने या पुलावरून वाहने ये-जा करत आहेत. पुलाच्या डागडुजीकरणाला २३ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, जवळपास तीन ते चार महिने हे काम सुरू राहणार असल्याची माहिती येथील ठेकेदाराने दिली आहे. यात पुलाची डागडुजी, कलर काम, रेलिंग दुरु स्ती काम करण्यात येणार आहे.
।‘लोकमत’चेही मानले आभार
चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच धनंजय पाटील यांनी या विषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पुलाची अवस्था दयनीय झालेली होती, डागडुजी करण्याची मागणी केली होती. या विषयी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर दुरु स्ती कामाला सुरु वात करण्यात आली असून, ‘लोकमत’चे ग्रामस्थांच्या वतीने त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Web Title: Dangerous Chihely Bridge Repair Work Continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.