दप्तराचे ‘ओझे’ मुख्याध्यापकांच्या खांद्यावर

By admin | Published: November 11, 2015 12:28 AM2015-11-11T00:28:57+5:302015-11-11T00:28:57+5:30

विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुचवलेले उपाय ३0 नोव्हेंबरपर्यंत अमलात आणण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

Dapatra's 'burden' on the shoulders of the headmasters | दप्तराचे ‘ओझे’ मुख्याध्यापकांच्या खांद्यावर

दप्तराचे ‘ओझे’ मुख्याध्यापकांच्या खांद्यावर

Next

प्रशांत शेडगे, पनवेल
विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुचवलेले उपाय ३0 नोव्हेंबरपर्यंत अमलात आणण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका झाली नाही तर मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही दिला.
शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले आहे. त्याबाबत रायगड जिल्ह्यातील ३८00 शाळांना माहिती देण्यात आली असून हा विषय गांभीर्याने घेण्याचे आदेश जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
वेगवेगळे विषय, व्यवसाय, पुस्तके, वह्या, इतर साहित्याने विद्यार्थ्यांची बॅग गच्च भरते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवर मोठे ओझे लादल्यासारखे होते. त्यामुळे अनेकांना शारीरिक व्याधी जडल्या आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक दप्तराचे ओझे असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्याने शिक्षणाचा मूळ हेतूच बाजूला पडला, असे याचिकेत म्हटले होते. याबाबत न्यायालयाने शासनाकडे विचारणा केली.
नेमके उपाय सुचवण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. त्याने सादर केलेल्या अहवालावर २१ जुलै २0१५ रोजी शासनाने निर्णय घेतला. आवश्यक त्या तयारीसाठी शाळांना महिन्यांचा अवधी दिला. ही मुदत आता ३0 नोव्हेंबरला संपुष्टात येत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्या संपल्या, की विद्यार्थ्यांचे दप्तर आता थोडेसे हलके होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हा शिक्षण विभागाकडे हे पत्रक आले आहे. त्यानुसार संबंधित शाळांना सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा शिक्षण कार्यालयाकडून सांगण्यात आले.
रायगड जिल्ह्यात २0३८ जिल्हा परिषद, ८५ नगरपालिका आणि ६00 खाजगी अशा ३८00 शाळा असून त्यांना याबाबत सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांची बैठक घेवून अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात येणार आहेत. जर दप्तराचे ओझे कमी झाले नाही तर त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- शेषराव बढे,
जिल्हा शिक्षण अधिकारी,
(प्राथमिक विभाग), रायगड
सरकारी प्रकाशनांशिवाय इतर पुस्तकांचा अवलंब नको, व्यवसाय, परिसर, कार्यानुभव यांचा अतिरेक करू नये, शाळेतील अभ्यासाशिवाय घरचा अभ्यास मर्यादित ठेवा,उपक्र मांच्या नावाने स्वतंत्र वह्या अन्य पुस्तके ठेवू नये याबाबत विद्यार्थी-पालकांना सूचना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शाळेत स्वच्छ पाण्याची सोय करण्याबाबत रायगड जिल्ह्यातील सगळ्या शाळांना सूचना देण्यात येणार आहेत. ज्यामुळे पाण्याच्या बाटलीचे ओझे कमी करता येणार आहे. संबंधित आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही याची तपासणी करण्याकरिता भरारी पथक नेमण्यात येणार आहेत.

Web Title: Dapatra's 'burden' on the shoulders of the headmasters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.