पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणीची मुदत मंगळवारी संपणार
By कमलाकर कांबळे | Updated: May 27, 2024 19:43 IST2024-05-27T19:42:39+5:302024-05-27T19:43:26+5:30
मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणीची मुदत मंगळवारी संपणार
नवी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ मे असून हे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, या मतदार संघासाठी २६ जून रोजी मतदान होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार या निवडणुकीसाठी ३१ मे ते ७ जून या कालावधीत इच्छूक उमेदवारांना नामनिर्देश पत्रे सादर करता येणार आहेत. तर बुधवार दिनांक २६ जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता २४ मे पासून लागू झाली आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मंगळवार २८ मे अंतिम मुदत असून जास्तीत जास्त पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी या मुदतीत मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सह निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे.