अटके त असलेल्या आरोपीचा मृत्यू
By admin | Published: February 23, 2017 06:10 AM2017-02-23T06:10:40+5:302017-02-23T06:10:40+5:30
अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गेल्या २० दिवसांपासून तळोजा जेलमध्ये न्यायालयीन
पनवेल : अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गेल्या २० दिवसांपासून तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या परबजितसिंग दारासिंग गाखल (५०) या आरोपींचा मृत्यू झाला आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मृत आरोपी परबजितसिंग हा अफू आणि कोडाइन पावडर बनवून त्याची विक्र ी करत असे. तसेच या अमली पदार्थांचे सेवनही करत असे. २९ जानेवारी रोजी कळंबोली पोलिसांनी त्याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्याची रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली होती. जेलमध्ये गेल्यानंतर अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी न मिळाल्याने तो आजारी पडला होता. त्याला उपचारासाठी मुंबईतील रु ग्णालयामध्ये दाखल केले होते. तसेच जेलमध्ये नियमित उपचार सुरू होते. मात्र, त्याचा मृत्यू झाला.