तळोजा जेलमध्ये अटके त असलेल्या आरोपीचा मृत्यू

By admin | Published: February 23, 2017 06:36 AM2017-02-23T06:36:49+5:302017-02-23T06:36:49+5:30

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी अटक केलल्या

Death of accused in Taloja jail | तळोजा जेलमध्ये अटके त असलेल्या आरोपीचा मृत्यू

तळोजा जेलमध्ये अटके त असलेल्या आरोपीचा मृत्यू

Next

पनवेल : अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी अटक केलल्या, तसेच गेल्या २० दिवसांपासून तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या परबजितसिंग दारासिंग गाखल (५०) या आरोपींचा मृत्यू झाला आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मृत आरोपी परबजितसिंग हा अफू आणि कोडाइन पावडर बनवून त्याची विक्र ी करत असे. तसेच या अमली पदार्थांचे सेवनही करत असे. २९ जानेवारी रोजी कळंबोली पोलिसांनी त्याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्याकडून जवळपास पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्याची रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली होती. जेलमध्ये गेल्यानंतर अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी न मिळाल्याने तो आजारी पडला होता. त्याला उपचारासाठी मुंबईतील रु ग्णालयामध्ये दाखल केले होते.
तसेच जेलमध्ये नियमित उपचार सुरू होते. मात्र, त्याचा जेलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Death of accused in Taloja jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.