- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री सुरु असून त्यात ब्राऊन शुगरचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक नोडमध्ये किमान १२ ते १५ जणांकडून त्याची विक्री होत असून तेदेखील नशेच्या आहारी गेलेले आहेत. त्यांच्याकडून महाविद्यालयीन तरुणांसह रिक्षाचालकांना या नशेची लत लावून ग्राहक वाढवले जात आहेत.शहरातील महाविद्यालयीन तरुण, झोपड्यांमधील रहिवाशी तसेच रिक्षाचालकांमध्ये नशेच प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्यांच्याकडून केल्या जाणारया नशेसाठी वापरल्या जाणारया अमली पदार्थांमध्ये गांजासह एमडी पावडर व ब्राऊन शुगरचाही समावेश दिसून येत आहे. तर मागील काही महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात ब्राऊन शुगरचीदेखील विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. शंभर रुपयांना एक पुडी विक्रली जात असून, नशा करणाऱ्यांमध्ये ती चिट्टी म्हणुन बोलली जात आहे. तर दहा चिट्टयांच्या पिशवीला पोटला हा शब्द वापरला जात आहे. चिट्टीची विक्री करणारयांना हा एक पोटला ६५०० ते ७००० रुपयांना मिळतो. यानंतर त्यांच्याकडून एका पोटल्यामागे तीन ते साडेतीन हजार रुपयांचा नफा मिळवण्यासाठी एक चिट्टी शंभर रुपयांना विकली जात असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंगमध्ये समोर आले आहे. त्यानुसार सद्यस्थितीला प्रत्येक नोडमध्ये १० ते १२ जणांकडून या चिट्टीच्या विक्रीचा व्यवसाय केला जात असून त्यांचे रोजचे ग्राहक देखिल ठरलेले आहेत. त्यामद्ये रिक्षाचालकांसह महाविद्यायीन तरुणांचा सर्वाधिक समावेश दिसून येत आहे. त्यामद्ये कोपर खैरणे परिसरात सर्वाधिकजन हि नशा करत असल्याचे एकून परिस्थितीवरुन दिसून येत आहे. त्यांच्याकडून नशा करण्यासाठी महावितरणच्या उघड्या ट्रान्सफार्मर रुम तसेच मोकळी मैदाणे वापरली जात आहेत. अनेकदा ठरावीकजन एकत्र येवून त्याची नशा करतानाही आढळत आहेत. यावेळी नशेमध्ये त्यांच्याकडून हाणामारीच्याही घटना घडत आहेत.काही महिण्यांपुर्वी बोनकोडेतील एका तरुणाने मोठ्या प्रमाणात चिट्टीची विक्री सुरु करुन नफा कमवायला सुरवात केली होती. यादरम्यान तो देखिल नशेच्या आहारी गेल्याचे परिणाम दिसू लागल्यानंतर कुटूंबियांनी त्याला पुर्नवसन केंद्रात दाखल केले आहे. मात्र यानंतर त्याच्याकडून जी मुले चिट्टी विकत घ्यायची त्यांनीच विक्री सुरु केली असून मागील काही दिवसात त्यांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे शंभर रुपयांमध्ये विकत मिळणारया या मृत्यूच्या आहारी शहरातला तरूण वर्ग जात चालला आहे.मागील महिन्यांपासून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवली जात आहे. त्याकरिता विशेष पथक देखिल तयार करण्यात आले आहे. या पथका यापूर्वी यापुर्वी मोठ्या प्रमाणात गांजा व एमडी पावडर जप्त केला आहे.गुन्हेगारीला प्रोत्साहनसद्यस्थितीला शहरात मोठ्या प्रमाणात बोगस रिक्षा चालत असून, त्या चालवणारे तरून गुन्हेगारी प्रवृत्तीचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून नशा करुनच रिक्षा चालवल्या जात आहेत. अशावेळी एखाद्या प्रवाशांसोबत अथवा इतर वाहनचालकांसोबत वाद झाल्यास त्यांच्याकडून नशेमध्ये जिवघेना हल्ला होत आहे.परंतु जागोजागी नाकाबंदीत वाहनांची झडाझडती होत असतानाही गर्दुले रिक्षाचालक त्यामधून कसे सुटतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे अमली पदार्थांची विक्री करणारयांविरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार यासंदर्भात पोलीसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही.नशेमध्ये कुटुंबीयांवरही हल्लेनशेच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून चिट्टी खरेदीसाठी घरच्यांकडे पैशाचा हट्ट केल्यानंतर तो पुर्ण न झाल्यास आई वडिलांवर देखिल हल्ले होत आहेत. अशाच प्रकारातुन काही मुलांनी रात्रीच्या वेळी रस्त्यालगतच्या उभ्या वाहनांमधून पेट्रोल चोरीचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे कोपरखैरणेसह अनेक परिसरात सातत्याने पेट्रोल चोरीच्या घटना घडत आहेत.पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार संपुर्ण आयुक्तालयात तीन विशेष पथकांमार्फत अमली पदार्थ विरोधी कारवाया केल्या जात आहेत. त्यानुसार संपुर्ण आयुक्तालयात महिन्याभरात ५० हुन अधिक कारवाया झाल्या आहेत. तर ब्राऊन शुगरची देखिल विक्री होत असल्यास संबंधीतांचा शोध घेवून त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.- पंकज डहाणे, पोलीस उपआयुक्त.मस्जिद बंदर परिसरातून पुरवठामस्जिद बंदर परिसरात अम्मा नावाच्या एका महिलेकडून ब्राऊन शुगरची विक्री होत आहे. त्याठिकाणावरुन गरजेनुसार पोटला खरेदी केल्यानंतर रेल्वेमार्गेच तो नवी मुंबईत आनला जात आहे. या कामाकरिता काहींनी वेगळी मुले ठेवली असून त्यांना १०० ते २०० रुपये एका फेरिला याप्रमाणे पैसे मोजले जात आहेत.
शंभर रुपयांत विकला जातोय मृत्यू; नवी मुंबईची तरुणाई ब्राऊन शुगरच्या आहारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 2:34 AM