महापे रस्त्यावर डंपरच्या धडकेने मुलाचा मृत्यू

By Admin | Published: November 10, 2015 01:20 AM2015-11-10T01:20:56+5:302015-11-10T01:20:56+5:30

तुर्भे - महापे रोडवर इंदिरानगरजवळ रविवारी सकाळी डंपरच्या धडकेने साहिल अशोक वैरागे (९) या मुलाचा मृत्यू झाला आहे.

The death of a child with a dump shock on the Great Road | महापे रस्त्यावर डंपरच्या धडकेने मुलाचा मृत्यू

महापे रस्त्यावर डंपरच्या धडकेने मुलाचा मृत्यू

googlenewsNext

नवी मुंबई : तुर्भे - महापे रोडवर इंदिरानगरजवळ रविवारी सकाळी डंपरच्या धडकेने साहिल अशोक वैरागे (९) या मुलाचा मृत्यू झाला आहे. याविषयी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी चालकास अटक केली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकरची मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
औद्योगिक वसाहतीमधून तुर्भे - महापे रोड जात असल्यामुळे दिवस - रात्री या परिसरात अवजड वाहनांची वर्दळ असते. इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये जवळपास वीस हजार लोकवस्ती आहे. नागरिकांना कामनिमित्त तुर्भे नाका व इतर ठिकाणी वारंवार जावे लागते. रोज हजारो नागरिकांना रस्ता ओलांडावा लागतो. रविवारी सकाळी रस्ता ओलांडत असणाऱ्या साहिल वैरागे याला
डंपरने धडक दिली. या धडकेमध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला. या परिसरात अशाप्रकारे वारंवार अपघात होवू लागले असून वर्षभरामध्ये जवळपास तिघांचा मृत्यू झाला आहे. अनेकांना गंभीर दुखापत झाली
आहे.
अपघातामध्ये मृत्यू झालेल्या साहीलचे वडील बिगारी काम करत असून आई घरकाम करत आहे. मुलाच्या अचानक मृत्यूमुळे त्यांनाही धक्का बसला आहे. इंदिरानगर व बगाडे परिसरातील नागरिकांनी या रोडवर स्पीड बे्रकर बसविण्याची मागणी अनेक वेळा केली आहे. शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनीही वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु पालिका प्रशासनाने या समस्येकडे दुर्र्लक्ष केले असल्यामुळेच अपघात होवू लागले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The death of a child with a dump shock on the Great Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.