पनवेल महापालिकेच्या सफाई कामगाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 11:48 PM2019-07-19T23:48:53+5:302019-07-19T23:48:59+5:30

पनवेल महापालिकेतील खारघर विभागात कार्यरत असलेल्या रवींद्र कमळ पाटील (४२) या सफाई कामगाराचा गुरुवारी मृत्यू झाला.

Death of clean worker of Panvel municipal corporation | पनवेल महापालिकेच्या सफाई कामगाराचा मृत्यू

पनवेल महापालिकेच्या सफाई कामगाराचा मृत्यू

Next

पनवेल : पनवेल महापालिकेतील खारघर विभागात कार्यरत असलेल्या रवींद्र कमळ पाटील (४२) या सफाई कामगाराचा गुरुवारी मृत्यू झाला. आठवडाभरापेक्षा जास्त काळापासून पाटील निमोनियाने ग्रासले होते. सध्याच्या घडीला साथीचे आजार बळावले आहेत. त्यातच महापालिकेमार्फत कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय विमा काढले गेले नसल्याने शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
खारघर विभागातच सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या गणेश भवर यांनाही शुक्रवारी भोवळ आली. त्यांना एमजीएम रुग्णालय, सीबीडी बेलापूर या ठिकाणी दाखल केले आहे. सफाई कामगारांच्या प्रकरणी सेनेचे पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना पत्र लिहून पालिकेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा तत्काळ वैद्यकीय विमा काढण्याची विनंती केली आहे. पूर्वाश्रमीचे ३८४ कर्मचारी पालिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. यापैकी काही कर्मचारी निवृत्त झाले आहेत. सध्याच्या घडीला ३१० पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीतील कर्मचाºयांसह नगरपरिषदेमधील कर्मचारी कार्यरत आहेत. संबंधित कर्मचाºयांचा अपघाती विमा उतरविण्यात आलेला आहे. मात्र, वैद्यकीय विमा उतरविण्यात आला नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसाठी कर्मचाºयांना पदरमोड करावी लागत आहे.
सफाई कर्मचारी सतत घनकचरा व्यवस्थापनात गुंतलेले असल्याने त्यांना प्रकृती अस्वस्थेचे प्रश्न भेडसावत असतात. रवींद्र पाटीलचाही याच कारणांमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, घरातील कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबाची वाताहत होत आहे. सध्याच्या घडीला पालिकेच्या मार्फ त केवळ या कर्मचाºयांचा अपघात विमा काढण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिकेत अद्यापपर्यंत पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाºयांचा समावेश झाला नसल्याने या कर्मचाºयांचा वैद्यकीय विमा उतरविण्यात आलेला नसल्याची माहिती सहायक उपायुक्त चंद्रशेखर खामकर यांनी दिली.
कर्मचाºयांचे समावेशन झाले नसल्याने पालिकेसमोरही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मात्र, सध्याच्या घडीला पालिकेसाठी दिवसरात्र काम करणाºया कर्मचाºयांना अशाप्रकारे उघड्यावर सोडता येणार नाही, याकरिता आयुक्तांनी याबाबत गांभीर्याने विचार करून तत्काळ सर्वच कर्मचाºयांचा वैद्यकीय विमा उतरविण्याची विनंती जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केली आहे.
>साहित्य पुरविण्याची मागणी
सफाई कर्मचारी काम करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा साहित्य पुरविण्यात आलेले नाही. या कर्मचाºयांना गमबुट, मास, हॅण्डग्लोज आदी साहित्य पालिकेने तत्काळ पुरवावे. सध्याच्या घडीला साथीच्या आजारामुळे सफाई कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सेनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Death of clean worker of Panvel municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.