नवी मुंबई : भरधाव एनएमएमटीच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घणसोली येथे घडली. या प्रकारामुळे संतप्त रिक्षाचालकांनी घणसोली बस डेपोसमोर जमून संताप व्यक्त केला. तर अपघातानंतर घटनास्थळावरुन पळालेला बस चालक थेट पोलीस ठाण्यात हजर राहिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.घणसोली सेक्टर १६ येथे एनएमएमटी बस डेपोच्या मागच्या रस्त्यावर सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. घणसोली गावात राहणारे बालाजी इंगळे (४८) हे त्यांच्या रिक्षाकडे चालले होते. यावेळी भरधाव एनएमएमटीने धडक देवून त्यांना सुमारे ५० मीटरपर्यंत फरफटत नेले. इंगळे यांच्या साथीदारांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषीत केले. अपघातानंतर जमाव वाढल्याने बसचालक व वाहकांने बस घटनास्थळी सोडून पळ काढला. यामुळे संतप्त रिक्षाचालकांनी वाहतूक बंद करुन एनएमएमटी डेपोसमोर गर्दी केली.>उरण फाटा येथे ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्यांचा मृत्यूनवी मुंबई : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सायन पनवेल मार्गावर उरण फाटा येथे हा अपघात घडला आहे. अपघातानंतर फरार ट्रक चालकाचा नेरुळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खारघरमध्ये राहणारा अजय पाटील (१८) हा विद्यार्थी दुचाकीवरून जात असताना ट्रकने त्याला धडक दिली. यात त्याचा जागीच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह रुग्णालयात पाठवला. पघातप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नेरूळ सेक्टर २ येथे घडलेल्या दुसºया अपघातात तरुणाचे प्राण थोडक्यात वाचले. वळणाचा अंदाज न आल्याने एनएमएमटी बस व दुचाकीमध्ये हा अपघात घडला. दोन्ही वाहने भरधाव वेगात असल्याने उजवीकडून आलेली दुचाकी बसखाली घुसली. दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली. मात्र दुचाकी बसखाली अडकल्याने काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.
एनएमएमटीच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:29 AM