टेम्पोच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

By admin | Published: August 25, 2015 01:24 AM2015-08-25T01:24:41+5:302015-08-25T01:24:41+5:30

भरधाव टेम्पोच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूची घटना सोमवारी सकाळी वाशीत घडली. ती स्कुटरवरून कॉलेजला जात असताना सिग्नल सुटल्यानंतर

Death of a student in tempo | टेम्पोच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

Next

नवी मुंबई : भरधाव टेम्पोच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूची घटना सोमवारी सकाळी वाशीत घडली. ती स्कुटरवरून कॉलेजला जात असताना सिग्नल सुटल्यानंतर भरधाव निघालेल्या टेम्पोने तिला धडक दिली. त्यामध्ये दुभाजकावर आदळून ती खाली पडली असता टेम्पोचे चाक तिच्या अंगावरून गेले. घटनेनंतर टेम्पोचालक पळाला मात्र नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले.
प्रियांका सोलाट (२३) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. घणसोली येथे राहणारी प्रियांका सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास डीओ स्कुटरवरून कॉलेजला चालली होती. वाशीतील आयसीएल कॉलेजमध्ये तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत ती शिकत होती. सोमवारी ती परीक्षेसाठी चालली होती. वाशी सेक्टर २९ येथील सिग्नल सुटल्यानंतर ती जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव पिकअप टेम्पोने तिला धडक दिली. या धडकेने ती दुभाजकावर आदळून खाली पडल्यानंतर तिच्या अंगावरून टेम्पोचे चाक गेले. नागरिकांनीच तिला वाशीच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु घटनास्थळीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. प्रियांका ही मनसेचे माजी पदाधिकारी भगवान सोलाट यांची मुलगी आहे. अपघातानंतर टेम्पो चालकाने टेम्पोसह पळ काढला होता. अखेर एका दुचाकीस्वाराने टेम्पोचा (एमएच ४३ एसी ८७२७) पाठलाग करून वाशी सेक्टर ९ मधून त्याला पकडले. बिपीनकुमार सिंग असे त्याचे नाव असून त्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे.
वाशी सेक्टर २९ येथील ब्ल्यू डायमंड हॉटेलसमोरील सिग्नलच्या ठिकाणी चार मार्ग एकत्र होतात. त्यापैकी वाशी - कोपरखैरणेला जोडणाऱ्या मुख्य मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे सिग्नल सुटताच किंवा सिग्नल सुरु असतानाही अनेक वाहनचालक सिग्नल तोडून वाहने पळवतात. त्यामुळे यापूर्वीही त्याठिकाणी अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. यासाठी येथे चौक उभारणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.(प्रतिनिधी)

कॉलसेंटर कारला बसची धडक; तरुणाचा मृत्यू
वाशी रेल्वेस्थानकालगत अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. सोमवारी सकाळी कॉलसेंटरच्या कारला भरधाव बसची धडक बसल्याने हा अपघात झाला. जखमींवर वाशीतल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांचीही प्रकृती गंभीर आहे. विश्वरूप आयटी पार्कमध्ये काम करणारे तरुण इंडिका कारने कार्यालयाकडे येत होते. त्यांची कार रेल्वेस्थानकाच्या दिशेने वळत असताना समोरून आलेल्या भरधाव खाजगी बसने कारला धडक दिली. या अपघातात सिध्दार्थ पठारे यांचा मत्यू झाला,तर नितेश गमरे व अंकुश कळंबे जखमी झाले.या अपघाताची नोंद वाशी पोलीस ठाण्यात आहे.

Web Title: Death of a student in tempo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.