शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

टेम्पोच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

By admin | Published: August 25, 2015 1:24 AM

भरधाव टेम्पोच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूची घटना सोमवारी सकाळी वाशीत घडली. ती स्कुटरवरून कॉलेजला जात असताना सिग्नल सुटल्यानंतर

नवी मुंबई : भरधाव टेम्पोच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूची घटना सोमवारी सकाळी वाशीत घडली. ती स्कुटरवरून कॉलेजला जात असताना सिग्नल सुटल्यानंतर भरधाव निघालेल्या टेम्पोने तिला धडक दिली. त्यामध्ये दुभाजकावर आदळून ती खाली पडली असता टेम्पोचे चाक तिच्या अंगावरून गेले. घटनेनंतर टेम्पोचालक पळाला मात्र नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले.प्रियांका सोलाट (२३) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. घणसोली येथे राहणारी प्रियांका सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास डीओ स्कुटरवरून कॉलेजला चालली होती. वाशीतील आयसीएल कॉलेजमध्ये तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत ती शिकत होती. सोमवारी ती परीक्षेसाठी चालली होती. वाशी सेक्टर २९ येथील सिग्नल सुटल्यानंतर ती जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव पिकअप टेम्पोने तिला धडक दिली. या धडकेने ती दुभाजकावर आदळून खाली पडल्यानंतर तिच्या अंगावरून टेम्पोचे चाक गेले. नागरिकांनीच तिला वाशीच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु घटनास्थळीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. प्रियांका ही मनसेचे माजी पदाधिकारी भगवान सोलाट यांची मुलगी आहे. अपघातानंतर टेम्पो चालकाने टेम्पोसह पळ काढला होता. अखेर एका दुचाकीस्वाराने टेम्पोचा (एमएच ४३ एसी ८७२७) पाठलाग करून वाशी सेक्टर ९ मधून त्याला पकडले. बिपीनकुमार सिंग असे त्याचे नाव असून त्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. वाशी सेक्टर २९ येथील ब्ल्यू डायमंड हॉटेलसमोरील सिग्नलच्या ठिकाणी चार मार्ग एकत्र होतात. त्यापैकी वाशी - कोपरखैरणेला जोडणाऱ्या मुख्य मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे सिग्नल सुटताच किंवा सिग्नल सुरु असतानाही अनेक वाहनचालक सिग्नल तोडून वाहने पळवतात. त्यामुळे यापूर्वीही त्याठिकाणी अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. यासाठी येथे चौक उभारणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.(प्रतिनिधी)कॉलसेंटर कारला बसची धडक; तरुणाचा मृत्यू वाशी रेल्वेस्थानकालगत अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. सोमवारी सकाळी कॉलसेंटरच्या कारला भरधाव बसची धडक बसल्याने हा अपघात झाला. जखमींवर वाशीतल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांचीही प्रकृती गंभीर आहे. विश्वरूप आयटी पार्कमध्ये काम करणारे तरुण इंडिका कारने कार्यालयाकडे येत होते. त्यांची कार रेल्वेस्थानकाच्या दिशेने वळत असताना समोरून आलेल्या भरधाव खाजगी बसने कारला धडक दिली. या अपघातात सिध्दार्थ पठारे यांचा मत्यू झाला,तर नितेश गमरे व अंकुश कळंबे जखमी झाले.या अपघाताची नोंद वाशी पोलीस ठाण्यात आहे.