मुंब्य्रात ट्रकच्या जोरदार धडकेत दोघांचा मृत्यू

By admin | Published: August 6, 2015 01:30 AM2015-08-06T01:30:25+5:302015-08-06T01:30:25+5:30

मुंब्रा बायपास येथून ठाण्याच्या दिशेने भन्नाट वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने कचऱ्याच्या टेम्पोला मागून धडक दिली. त्याच वेळी या दोन्ही वाहनांच्या मध्ये सापडून एका मोटारसायकलवरील जीवन

The death of two trucks in Mumbra tremors | मुंब्य्रात ट्रकच्या जोरदार धडकेत दोघांचा मृत्यू

मुंब्य्रात ट्रकच्या जोरदार धडकेत दोघांचा मृत्यू

Next

ठाणे / मुंब्रा : मुंब्रा बायपास येथून ठाण्याच्या दिशेने भन्नाट वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने कचऱ्याच्या टेम्पोला मागून धडक दिली. त्याच वेळी या दोन्ही वाहनांच्या मध्ये सापडून एका मोटारसायकलवरील जीवन जगत कारकी (२८) आणि मदन सखाराम भगत (३८) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसरा मोटारसायकलस्वार हिरा वारणीकर हा जखमी झाला आहे. या अपघातानंतर ट्रकचालक मात्र पसार झाला आहे.
हा विचित्र अपघात मुंब्य्रातील रेतीबंदर भागात बुधवारी सकाळी १०.१५ वा.च्या सुमारास घडला. खारेगाव टोलनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकवरील चालकाचे उतारावर नियंत्रण सुटल्याने त्याने कचऱ्याच्या टेम्पोला वाचविताना टेम्पोसह दोन मोटारसायकली आणि एका कारलाही जोरदार धडक दिली. यात टेम्पोचालक चंद्रकांत नामदेव पाठारे (२८) हे जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघातानंतर धडक देणारा ट्रकचालक ट्रकसह पसार झाला. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध अपघातास आणि दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: The death of two trucks in Mumbra tremors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.