एक्स्प्रेस-वेवर अपघातात महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 07:19 AM2017-11-28T07:19:19+5:302017-11-28T07:19:21+5:30
पनवेल तालुक्यातील आदईजवळील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या अपघातात एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. आदई गावाजवळ असलेला शॉर्टकट या महिलेसाठी जीवघेणा ठरला आहे.
पनवेल : तालुक्यातील आदईजवळील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या अपघातात एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. आदई गावाजवळ असलेला शॉर्टकट या महिलेसाठी जीवघेणा ठरला आहे. कमलाबाई नारायण काशिदे (६०) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून आदई गावात जाण्यासाठी शॉर्टकटचा वापर केला जातो. याच शॉर्टकटचा वापर करून मोठ्या प्रमाणात नागरिक हायवेवरून दररोज ये-जा करत असतात. येथून जाताना काहींना मृत्यूने देखील गाठले आहे. सुकापूर येथे राहणाºया कमलाबाई नारायण काशिदे (६०) या आदई येथील आपल्या मुलीकडे जात होत्या. या वेळी त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आदई गावाकडे जाणाºया शॉर्टकटचा पर्याय निवडला. या शॉर्टकटचा वापर करून त्यांनी या हायवेवरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या एमएच ०२/ ४२५७ या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात कमलाबाई यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे.
अधिक तपास खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोंगे करत आहेत. अपघातात मृत्युमुखी पडून जीव गमावावा लागत असल्याने हा शॉर्टकट बंद करण्याची मागणी केली जात आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून आदई गावात जाण्यासाठी केला जातो शॉर्टकटचा वापर