उरण : उरण तालुक्यातील भोम गावातील रहिवासी असणाऱ्या ऋषण पाटील (३५) या कामगाराच्या डोक्यावरून आॅइलचा टँकर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात सोमवारी दुपारी जेएनपीटी बंदराजवळ गणेश बन्जो प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर झाला आहे. या संदर्भात न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऋ षण पाटील हा जेएनपीटीतील गणेश बन्जो प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोरून कामानिमित्त जात होता. त्याच दरम्यान प्रकल्पात जाणाºया आॅइलच्या टँकरच्या चाकाखाली आल्याने ऋ षणचा जागीच मृत्यू झाला. ऋ षण पाटील हा सध्या कुटुंबासह पनवेल येथे राहत असला तरी तो मूळ उरण तालुक्यातील भोम या गावचा रहिवासी आहे. या प्रकरणी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात अपघातग्रस्त टँकरच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोक्यावरून टँकर गेल्याने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 5:23 AM